सेन्सोडाइनची दातखिळी बसली; १० लाखांचा दंड

सेन्सोडाइनची दातखिळी बसली; १० लाखांचा दंड

खोटा दावा करणाऱ्या जाहिराती बंद करण्याचे आदेश

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल सेन्सोडाइन टूथपेस्ट कंपनीला सात दिवसांत या जाहिराती हटविण्याचे आदेश दिले असून १० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

सेन्सोडाइन टूथपेस्टच्या जाहिरातीच्या माध्यमातून असा दावा करण्यात येत होता की, ही टूथपेस्ट जगातील नामांकित डॉक्टरांनी शिफारस केलेली आहे आणि हिरड्यांना येणाऱ्या झिणझिण्या कमी करणारी एकमेव तसेच जगातील पहिल्या क्रमांकाची टूथपेस्ट आहे. या जाहिराती आता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सीसीपीएच्या प्रमुख निधी खरे यांनी याबाबत सांगितले की, सेन्सोडाइनच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणारी जाहिरात केली जात होती, त्याबाबत त्यांना याआधीच इशारा देण्यात आला होता आणि जाहिराती मागे घेण्यास सांगण्यात आले होते. ९ फेब्रुवारी २०२२मध्ये त्यांना या जाहिराती काढून टाकण्यास सांगण्यात आले होते. या जाहिरातीत परदेशी दंतवैद्यही या टूथपेस्टची शिफारस करताना दाखविले आहेत.

हे ही वाचा:

सुजित पाटकर व इतरांविरुद्ध सोमय्यांची एस्प्लनेड न्यायालयात याचिका

राज्यातून कोरोना निर्बंध हटणार?

प्लॅस्टिक कचरामुक्तीमुळे भाईंदरच्या बीचने घेतला मोकळा श्वास

ED कडे विदेशातील बेनामी प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा???

 

पण सीसीपीएने स्वतः या प्रकरणात लक्ष घालून टीव्ही, यूट्युब, फेसबुक आणि ट्विटरवर येणाऱ्या सेन्सोडाइनच्या जाहिरातींवर बंदी घातली. या जाहिरातीत लंडनस्थित दाताचे डॉक्टर सेन्सोडाइन वापरण्याचा सल्ला देताना दाखविले आहेत. अवघ्या ६० सेकंदांत ही टूथपेस्ट काम करण्यास सुरुवात करते असा दावाही या जाहिरातीत केला जात होता. पण या जाहिरातींच्या पुष्ठ्यर्थ कोणताही अभ्यास अथवा माहिती कंपनीच्या मार्फत सादर करण्यात आली नव्हती. त्यामुळे सीसीपीएने ड्रग कंट्रोलर जनरलना यासंदर्भात कळविले. तेव्हा ड्रग कंट्रोलरने सहाय्यक ड्रग कंट्रोलरना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Exit mobile version