१७व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; ५ जण मृत्युमुखी

१७व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; ५ जण मृत्युमुखी

वरळी बीडीडी चाळ येथील हनुमान गल्ली या ठिकाणी असलेल्या २० मजली इमारतीची लिफ्ट सतराव्या मजल्यावरून कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ मजुरांचा मृत्यु झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली.

अविनाश दास (३२), भरत मंडल (२८)चिन्मय मंडल (३३) ,अनोळखी (४५) अनोळखी (३५) या पाच मजूरांचा दुर्घटनेत मृत्यू झाला असून लक्ष्मण मंडल हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. वरळीतील शंकरराव फड पथ मार्ग हनुमान गल्ली या ठिकाणी असलेल्या अंबिका मिल च्या जागेवर ललित अंबिका या बांधकाम विकासकाकडून २०मजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचा एक भाग रहिवाशी यांच्यासाठी असून एक भाग व्यवसायिक असून दोन्ही इमारतीचा मधला भाग हा वाहन पार्कींग साठी बनवण्यात आलेला आहे.

हे ही वाचा :

….म्हणून ९९९पादचाऱ्यांनी गमावले प्राण!

स्टॅन स्वामी आणि न्यायालयाची माघार

आपत्तीची दरड….

भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास

शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पार्किंग भागाच्या बाजूची बांधकामासाठी तात्पुरती तयार करण्यात आलेली लिफ्ट सतराव्या मजल्यावरून ६ मजुरांना घेऊन खाली येत असताना लिफ्टमध्ये वजन वाढल्यामुळे लिफ्ट १७व्या मजल्यावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत जागीच पाच मजुरांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. मृतांमध्ये साईड सुपरवायझरचा समावेश असल्याची माहिती ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली. मृत्यु झालेल्यांमध्ये सर्व मजूर असून त्याच ठिकाणी राहण्यास होते. या दुर्घटनेला जबाबदार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

Exit mobile version