26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाकानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, यावेळीही रुळावर ठेवले सिलेंडर!

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, यावेळीही रुळावर ठेवले सिलेंडर!

पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु

Google News Follow

Related

देशातील अनेक राज्यांमधून ट्रेन उलटवण्याच्या कटाच्या बातम्या समोर येत आहेत. अज्ञातव्यक्तीकडून रेल्वे रुळावर वेगवेगळ्या वस्तू, ज्यामध्ये घरगुती सिलेंडर, लोखंडी पत्रा, विजेचा लोखंडी खांब, सिमेंटचे ब्लॉक आणि फिश प्लेट हे ठेवून ट्रेन उलटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा दले सतर्क आहेत, तरीही भारतातील विविध शहरांमधून असे कट रचले जात आहेत. मागच्या महिन्यात उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये रेल्वे रुळावर घरगुती सिलेंडर ठेवून कालिंदी एक्स्प्रेस उलटवण्याचा कट रचला होता, आता पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती झाली आहे.

कानपूर देहाटमधील प्रेमपूर स्टेशनजवळ रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर सापडला ठेवण्यात आला झोता. सुदैवाने लोकोपायलटमुळे दुर्घटना टळली, रुळावर सिलेंडर दिसताच त्यांनी इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली आणि तत्काळ रेल्वे आयओडब्ल्यूला कळवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी (२२ सप्टेंबर) पहाटे पाचच्या सुमारास जेटीटीएन मालगाडी कानपूरहून प्रयागराजच्या दिशेने जात होती. प्रेमपूर स्थानकावर लोको पायलट लूप लाईनवर आला असता ड्रायव्हरच्या सिग्नलच्या काही अंतरावर त्याला रेल्वे ट्रॅकवर काहीतरी दिसले, पायलटने तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. खाली उतरून पाहिले तर लोको पायलटला लहान घरगुती सिलेंडर रुळावर ठेवलेला दिसला, अशी माहिती लोको पायलटने रेल्वे पोलिसांना दिली.

हे ही वाचा : 

सोने आणि हिऱ्यांच्या तस्करीत तिघांना अटक, ३.१२ कोटींचा माल जप्त!

कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विजयांची संख्या आता जास्त, बांगलादेशला नमविले

पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित कसा होऊ दिला जातो?

पंतप्रधानांकडून बायडेन यांना चांदीच्या भारतीय ट्रेनचे मॉडेल भेट!

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे आयओडब्ल्यू, सुरक्षा दल आणि इतर पथक घटनास्थळी पोहोचले. गॅस सिलेंडर ट्रॅकवरून काढून त्याची तपासणी करण्यात आली, ती रिकामी असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा