उत्तराखंडमध्ये रेल्वे उलटवण्याचा कट; हरिद्वारहून डेहराडूनला जाणाऱ्या ट्रॅकवर सापडला डिटोनेटर

पोलिसांकडून तपास सुरू

उत्तराखंडमध्ये रेल्वे उलटवण्याचा कट; हरिद्वारहून डेहराडूनला जाणाऱ्या ट्रॅकवर सापडला डिटोनेटर

A view of Indian Railways Track

गेल्या काही महिन्यांत विविध राज्यांमध्ये रेल्वे रुळांवर काही वस्तू मुद्दाम ठेवून रेल्वे उलटवण्याचा कट रचण्याचे धक्कादायक प्रकार वारंवार घडत असल्याचे चित्र समोर येत आहे. उत्तराखंडमध्येही अशाच एका कटाचा पर्दाफार्श करण्यात आला. डेहराडूनमध्ये रेल्वे ट्रॅकवर डिटोनेटर आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हरिद्वारच्या मोतीचूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाचे नुकसान झाल्याची घटना घडली. प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील एका तरुणाला रेल्वे रुळाजवळून ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने हे डिटोनेटर पेरल्याचा संशय आहे.

हरिद्वारहून डेहराडूनला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर एक डिटोनेटर सापडला. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुळावर डिटोनेटर सापडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी लगेचच कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक तरुण रेल्वे रुळावर संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसला. पोलिसांनी तत्काळ तरुणाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. अशोक असे या तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी आहे. पोलिस आता त्याची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा : 

कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भारताविरुद्ध गुप्तचर माहिती फोडल्याची कबुली

सलमानला पुन्हा धमकी; अज्ञाताकडून दोन कोटींची मागणी

प्रभू श्रीराम, सावरकरांचा डाव्या संघटनांकडून अपमान, अभाविप कार्यकर्त्यांचा संताप!

बांगलादेशमध्ये छळ झालेल्या हिंदूंच्या न्यायाच्या आशा संपल्या

देशाच्या अनेक भागांमधून अशा घटना वारंवार समोर येत असून अनेक ठिकाणी रुळावर सिमेंट बार, सिलिंडर आणि ब्लॉक टाकून ट्रेन रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजस्थानमध्येही रेल्वे रुळावरून घसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय झारखंड आणि इतर राज्यांतूनही अशीच प्रकरणे समोर आली आहेत.

Exit mobile version