31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामाउदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्ग स्फोटाने उडवला

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्ग स्फोटाने उडवला

मोठ्या कटाचा संशय

Google News Follow

Related

उदयपूर-अहमदाबाद ब्रॉडगेज रेल्वे मार्ग स्फोटकांनी उडवून देण्याचा कट रचण्यात आला. उदयपूर जिल्ह्यातील केवडा जंगलासमोरील ओडा पूल स्फोटकांनी उडवून देण्याचा प्रयत्न केला. स्फोटामुळे रेल्वे रुळावर भेगा पडल्या आणि काही भाग तुटला. घटनास्थळी दारूगोळाही सापडला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी दहशतवादविरोधी पथक पोहोचले आहे. या मागे दहशतवादी कात आहे का याचा तपस घेण्यात येत आहे.

शनिवारी रात्री गावकऱ्यांना स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले. रविवारी सकाळी काही ग्रामस्थ ओडा पुलावरून जात असताना त्यांनी रुळाला भेगा पडल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. या रेल्वे मार्गावरून उदयपूर-अहमदाबाद पॅसेंजर ट्रेन चार तास आधी गेली होती. परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे.

हा मोठा कट असल्याचे प्रथमदर्शी वाटत असल्याचे उदयपूरचे जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी म्हटले आहे. अहमदाबादहून उदयपूरला येणारी पॅसेंजर ट्रेन येण्यापूर्वी त्यांनी प्रशासन, पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. स्फोटासाठी खाणकामात वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुळांना तडे गेले आहेत. रुळावरील नट-बोल्टही गायब आहेत.घटनास्थळावरून एक डिटोनेटरही सापडला असून तो सुपर ९० श्रेणीचा आहे

हे ही वाचा:

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

गुजरातमध्ये काँग्रेसच्या १५ दिवसांत २५ रॅली

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

उदयपूर जव्हार माइन्सचे स्टेशन ऑफिसर अनिल विश्नोई यांनी सांगितले की , खाण स्फोटात जे साहित्य वापरले गेले आहे. देशी बनावटीचे स्फोटक साहित्य सापडले आहे. हा स्फोट पूर्ण नियोजनानंतर करण्यात आला होता.बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले आणि पुरावे गोळा केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा