कोल्हापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार पांडुरंग पाटील उर्फ पी.एन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा छळ केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आमदार पांडुरंग पाटील यांची सून सौ.आदिती राजेश पाटील या महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी तर कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांची कन्या आहे. आमदार पी.एन पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा राजेश तसेच त्यांची मुलगी सौ.टीना महेश पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे. आदिती पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार तिची सासरकडची मंडळी अर्थात सासरे आमदार पांडुरंग पाटील त्यांचा मुलगा राजेश आणि मुलगी टीना हे आदितीला शिवीगाळ करून मारहाण करत होते. तर तिच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री! मोदी-शहांचे धक्कातंत्र कायम
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी विवाहितेला शारीरिक तसेच मानसिक त्रास देऊन तिचा छळ करणे, फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशा विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राज्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.