कर्नाटकातील बेळगावमध्ये स्थानिक काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो वापरून सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट शेअर केल्याबद्दल काँग्रेस नेते मुजम्मिल अत्तार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काँग्रेस नेता हा बेळगावातील आझाद नगरचा रहिवासी आहे.
काँग्रेस नेता मुजम्मिल अत्तार याने अलिकडेच इंस्टाग्रामवर एक भडकाऊ पोस्ट शेअर केली होती. यामध्ये काँग्रेस नेत्याने औरंगजेब आणि टिपू सुलतानचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, ‘बाप है तुम्हारा भूलना मत’. ही वादग्रस्त पोस्ट सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्याच्यावर कारवाईची मागणी होवू लागली.
या प्रकरणी आरोपी विरुद्ध बेळगाव मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपीने ही पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपी विरुद्ध पुढील कारवाई सुरु आहे.
हे ही वाचा :
यूएईच्या राष्ट्रपतींकडून ईदची भेट, ५०० भारतीयांसह १५०० हून अधिक कैद्यांची सुटका!
गाझामध्ये इस्रायली हल्ला, हमास प्रवक्त्यासह सात जण ठार!
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या चकमकीत ३ पोलीस हुतात्मा!
उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ?
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या नावाचा वाद आणखी वाढला आहे. तथापि, यापूर्वीही औरंगजेबाच्या नावावरून वाद झाला होता. पण ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची क्रूरता पाहिल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये औरंगजेबाबद्दल प्रचंड संताप आहे. अशा परिस्थितीत, औरंगजेबाची कबर हटवण्याच्या प्रकरणी नागपुरात अलीकडेच हिंसाचार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.