28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामा५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाला घेतले ताब्यात

५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाला घेतले ताब्यात

Google News Follow

Related

अनधिकृत दुकाने तोडू नयेत म्हणून २ कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यात तडजोड करून लाच स्वीकारणाऱ्या काँग्रेसच्या एका स्वीकृत नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सिद्धेश्वर मोगलप्पा कामुर्ती असे या नगरसेवकाचे नाव असून भिवंडी येथे पद्मानगर भाजी मार्केटमध्ये यासंदर्भात तक्रार करणाऱ्याचे तिथे दुकान आहे. तेथे असलेली १०० दुकाने अनधिकृत असून ती तोडण्यासंदर्भात कामुर्ती यांनी निजामपूर शहर महानगरपालिका येथे अर्ज केला होता. सदर अर्ज मागे घेण्याकरिता कामुर्ती याने तक्रारदाराकडे २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यावर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली होती.

तक्रारदाराने ३० सप्टेंबरला लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ४ ऑक्टोबरला केलेल्या तपासणीत आरोपी नगरसेवकाने ५० लाखांवर तडजोड केली होती. ती रक्कम त्याला तक्रारदाराकडून देण्यात येणार होती. १३ ऑक्टोबरला लाचलुचपत विभागाने सापळा रचून हे ५० लाख स्वीकारण्यासाठी आलेल्या कामुर्तीला अटक केली.

भिवंडी पोलिस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली होती. या नगरसेवकाचे वय ६२ असून त्याने स्वतःच तक्रार करून दुकाने तोडण्यासाठी मागणी केली आणि त्याचाच फायदा उठवत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता.

 

हे ही वाचा:

‘किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ तरी महिला आयोगावर नको!’

ICC T20 WC: भारतीय संघात लॉर्ड ठाकूरचा समावेश

IPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार

जळगावचे राजकारण फिरले! महापालिकेत पुन्हा भाजपाचे बहुमत

 

आता काँग्रेस पक्षाकडून कोणती कारवाई होणार हे स्पष्ट होईल. शिवाय, या स्वीकृत नगरसेवकाचे पद राहणार की जाणार हेदेखील लवकरच स्पष्ट होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा