जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दिवाळी कार्यक्रमादरम्यान राडा

कॅम्पसमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दिवाळी कार्यक्रमादरम्यान राडा

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्री दिवाळीनिमित्त आयोजित रांगोळी कार्यक्रमांवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त असून सध्या विद्यापीठामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दिल्लीस्थित जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ कॅम्पसच्या सात क्रमांकाच्या गेटवर दोन गटांमध्ये राडा झाला. कॅम्पसमध्ये दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काही लोकांनी रांगोळी आणि दिव्यांची तोडफोड केल्याचा आरोप आहे. यानंतर दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी आणि घोषणाबाजी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. सध्या परिस्थिती निवळली असून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विद्यापीठात दरवर्षी दिवाळीचे आयोजन केले जाते, जे एबीव्हीपी आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून संयुक्तपणे आयोजित केले जाते.

विद्यापीठात हा सर्व गोंधळ जवळपास एक तास सुरू होता. त्यानंतर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना शांततेचं आवाहन केलं. काही वेळाने घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती हाताळली. दरम्यान, सध्या परिस्थिती निवळली असली तरी तणावाचे वातावरण आहे. या गोंधळादरम्यान काही लोकांवर पॅलेस्टाईन झिंदाबादच्या घोषणा दिल्या, असे वृत्त आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा:

कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू

“आमचे संबंध इतके घनिष्ठ की, कोणत्याही अनुवादकाची गरज नाही”

शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेला जामीन पण मुक्काम तुरुंगातच

पुण्यात व्होट जिहाद, २१ बांगलादेशींना अटक!

दरम्यान, याआधीही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात अशा प्रकारच्या काही घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा विद्यापीठात राडा झाल्याच्या घटनेमुळे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ चर्चेत आले आहे. या वर्षी जानेवारीमध्ये जामिया विद्यापीठात बाबरीसाठी स्ट्राइक या सारख्या घोषणांचा व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.

Exit mobile version