“इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”, अल्पवयीन मुलीला धमकी

भाईंदर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

“इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”, अल्पवयीन मुलीला धमकी

एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मुलीला नकली बंदुकीने धमकवण्यात आले होते. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

पीडित १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी भाईंदरला वास्तव्यास असून १ जूनपासून मुनव्वर मन्सुरी आणि अजीम मन्सुरी हे दोन तरुण तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करून बोलण्याच्या प्रयत्न करत होते. त्यानंतर १२ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मुन्नवर मन्सुरी (२०) याने तिला इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिला बुरखा, चैन आणि अंगठी दिली. तसेच बुरखा घालून ये आपण पळून जाऊन लग्न करू असे त्या मुलीला सांगितले. मात्र, पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वर याने पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबुल केला नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी दिली.

हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने याची तक्रार भाईंदर पोलिसांकडे केली. भाईंदर पोलीसांनी मुन्नवर अन्सारी (२०) आणि अजीम मन्सुरी (१८) या दोघांना विनयभंगाच्या कलम ३५४, ३५४ (अ) ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक

मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त ट्वीटनंतर ठाणे पोलिसांनी मागितला नंबर

भाजपाने दार उघडलेले नाही, पण संकेत दिलेत…

काँग्रेसच्या कर्नाटक पॅटर्नवर उद्धव ठाकरेंचं मत काय?

‘दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे,’ असे भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version