23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामासराफा व्यापाऱ्याकडून शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या विरोधात फसवणूकीची तक्रार

सराफा व्यापाऱ्याकडून शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या विरोधात फसवणूकीची तक्रार

मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले चौकशी करण्याचे आदेश

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याची सांगत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

या सेलिब्रेटी दाम्पत्यावर आधी सुरु असलेल्या केसेस न्यायालयात सुरु असतानाच आता या दोघांचं नाव आणखी एका प्रकरणात समोर आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलीस ठाण्याला अभिनेत्री शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रावर एका सराफा व्यापाऱ्याने लावलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. रिद्धी सिद्धी बुलियन्सचे व्यवस्थापकीय संचालक, पृथ्वीराज कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने नमूद केल्यानंतर हे निर्देश आले आहेत.

पृथ्वीराज कोठारी यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुंद्रा दाम्पत्याने २०१४ मध्ये एक योजना सुरू केली होती. यामध्ये गुंतवणूकदारांसाठी एक योजना होती की, अर्ज करताना त्यांना सवलतीच्या दराने सोन्याचे आगाऊ पैसे भरण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर गुंतवणूक योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या किमतीचे सोने दिले जाणार होते. पुढे कोठारी यांनी २ एप्रिल २०१९ रोजी आपल्याला ५ हजार ग्रॅम २४ कॅरेट सोने दिले जाईल या विश्वासावर पंचवार्षिक योजनेअंतर्गत ९० लाख ३८ हजार ६०० रुपये गुंतवले. मात्र, कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार ठरलेले सोनं देण्यात आले नाही.

हे ही वाचा..

अंतरवालीत जरांगेंनंतर ओबीसी आक्रमक, उपोषण सुरु!

“ठाकरेंनी चार महिने ज्यांचे पाय पकडले त्यांच्यामुळेच माविआला मतदान”

उजैनमध्ये सट्टेबाजांवर पोलिसांचा छापा, १४.५८ कोटी रुपये जप्त!

फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर !

दरम्यान, राज कुंद्रा यांच्याविरोधात याआधीच ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. ईडीने काही स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. तर, अडल्ट फिल्म प्रकरणीही राज कुंद्राविरोधात आरोप आहेत. राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा