लोकप्रिय स्टँड- अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास हा त्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. वीर दासने दोन दिवसांपूर्वी एका अमेरिकेतील शो मध्ये भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्याच्या या वक्तव्यानंतर, जगभरातील भारतीयांकडून त्याच्यावर टीका केली जात आहे. भाजप- महाराष्ट्राचे कायदा सल्लागार वकील आशुतोष दुबे यांनी वीर दास विरोधात मुंबईत तक्रार केली आहे.
Delhi: Complaint received against actor-comedian Vir Das at Tilak Marg Police Station in connection with a viral video in which he is allegedly using derogatory language against the nation during an event in US.
(Photo courtesy: Vir Das' Instagram account) pic.twitter.com/KfTeH08oX9
— ANI (@ANI) November 17, 2021
अमेरिकेमधील एकक़ कार्यक्रमात ‘Two India’ (दोन भारत) या शीर्षकाखाली वीर दास याने एकपात्री प्रयोग सादर केला. त्यात त्याने म्हटले, “I come from an India where we worship woman during day and gang rape them at night” (मी अशा भारतातून येतो जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो).
त्याच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही लोकांनी त्याच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आहे, परंतु अनेकांनी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातील मिळणार फक्त ५९ रुपये
अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा रक्षकाला दीड कोटी मिळतच नव्हते
राज्यातील १०४ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचे आमरण उपोषण
… तर २४ तासात एसटी कर्मचाऱ्यांना कामातून कमी करणार
भारताविरुद्ध अपशब्द वापरल्या प्रकरणी, वीर दासच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील आशुतोष दुबे यांनी वीर दासविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अनेक भाजप नेत्यांनीही वीर दासवर टीका केली आहे.
प्रचंड प्रमाणात टीका झाल्यावर अभिनेता वीर दासने या वादावर ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ एकाच मुद्द्यावर वेगवेगळे विचार असण्याचे व्यंग आहे, असे स्पष्टीकरण वीर दास याने दिले आहे.