21 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरक्राईमनामा... म्हणून अभिनेता विकी कौशल विरुद्ध तक्रार दाखल

… म्हणून अभिनेता विकी कौशल विरुद्ध तक्रार दाखल

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील इंदौर येथील एका व्यक्तीने अभिनेता विकी कौशल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार फिर्यादीने विकी विरोधात वाहनाच्या नंबर प्लेटचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी ही तक्रार केली आहे. सध्या विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणानिमित्त इंदौरच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसला होता.

तक्रारदार फिर्यादी जयसिंग यादव यांनी एएनआयला सांगितले की, “चित्रपटाच्या दृश्यात दिसलेल्या दुचाकीचा क्रमांक माझा आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना याची माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही. पण हे बेकायदेशीर आहे. माझ्या संमतीशिवाय ते माझा नंबर वापरू शकत नाहीत. याबाबत मी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची विनंती देखील मी केली आहे.”

त्यावर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनी यांनी म्हटले आहे की, “आमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाही. नंबर प्लेटचा गैरवापर झाला की नाही त्याची आम्ही पडताळणी करू आणि असे असल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.” चित्रपटाच्या त्या चित्रीकरणादरम्यान विकी कौशल सोबत त्याची सह कलाकार सारा अली खान त्याच्यासोबत दुचाकीवर फिरताना दिसली.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या जत्रोत्सवात कोरोना नियमांचा फज्जा

‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’

योगी आदित्यनाथ यांची जाहिरात कविता कृष्णन यांना झोंबली

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईतून ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

दरम्यान, कतरिना कैफ आणि विकी कौशलने लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र नवीन वर्ष साजरे केले. मध्य प्रदेशातील इंदौर शहरात आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असलेल्या या अभिनेत्याने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पत्नी कतरिनासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मुंबई गाठली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा