अखंड भारतवर्षाचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्याबद्दल एका व्हिडिओ संदेशाद्वारे अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या एका इसमा विरोधात पालघर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. इम्तियाझ खान असे या व्यक्तीचे नाव असून त्याने एका व्हिडीओ मधून भगवान रामचंद्रांबद्दल अपशब्द वापरून शिवीगाळ केली आहे. या विरोधात पालघर येथील वकील आशुतोष दुबे आणि स्वप्निल दवणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
ह्याची सुरुवात दिल्ली येथून झाली. दिल्ली येथे विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी समान नागरी कायद्याच्या मागणीसाठी एक रॅली आयोजित केली होती. दिल्लीतील जंतर मंतर परिसरात झालेल्या या रॅलीमध्ये काही घटकांकडून आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणांवर दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक करून गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणात कोर्टाने या आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
हे ही वाचा:
भारतात येणार चार नव्या हवाई कंपन्या?
उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश
अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत
पण ह्या आक्षेपार्ह घोषणांची बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली. यावरूनच इम्तियाझ खान याने एक व्हिडीओ संदेश पोस्ट केला. यावेळी त्याने मुसलमान समाजाला चिथावणी देणारी वक्तव्ये तर केलीच. पण त्यासोबतच प्रभू श्री रामचंद्रांना शिवीगाळही केली. त्यामुळे आता हा व्हिडिओ करणाऱ्या इम्तियाझ खानवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता समाजाच्या विविध स्तरातून होताना दिसत आहे.
I have filed the complaint at the SP office @Palghar_Police, @collectorpal, and at the local police station with @swapnildavane1 and @abhayharesh against "Imtiyaz Khan" (YouTube: Imtiyaz Official) who have abused Shri Ram Ji and hurts the religious sentiment of many Hindu's!🙏🚩 pic.twitter.com/fS9aXTocvH
— ADV. ASHUTOSH J. DUBEY🇮🇳 (@AdvAshutoshDube) August 11, 2021