मरीन ड्राईव्हमध्ये ८ वकिलांविरुद्ध लैगिंग अत्याचार, खंडणीचा गुन्हा

मरीन ड्राईव्हमध्ये ८ वकिलांविरुद्ध लैगिंग अत्याचार, खंडणीचा गुन्हा

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ८ वकिलांविरुद्ध अत्याचार, खंडणी, विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकील महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली आहे.

पीडित महिला ही व्यवसायाने वकील असून ती मागील काही महिन्यांपासून नरिमन पॉईंट येथील एका बड्या वकिलाच्या फर्ममध्ये काम करत होती. तिने सोमवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन ८ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने फर्मचे मुख्य वकील यांच्यासह इतर आठ जणांनी वेगवेगळ्या वेळी माझा विनयभंग केला तर माझ्यावर लैंगिक अत्याचार करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप या पीडित महिला वकिलाने केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमध्ये घनश्याम उपाध्याय, सुभाष झा यांच्यासह २ महिला वकिलांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध लैगिंग अत्याचार, खंडणी, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे,कट रचणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले आहे. अद्याप या गुन्हयात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली.

हे ही वाचा:

कंगना प्रकरणात जावेद अख्तर यांना कोर्टाने काय सुनावले?

तौक्तेच्या बार्जचा पालघरमधल्या स्थानिक मच्छिमारांना फटका

मुख्यमंत्री साहेब, तुम्ही हात जोडू नका!

मुख्यमंत्र्यांचा ‘पालखी सोहळा’ पूरग्रस्तांच्या दारी

Exit mobile version