32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरक्राईमनामापॅलेस्टिनी दहशतवाद्याचे कौतुक करणाऱ्या सुधन्वा देशपांडेंना IIT मध्ये आमंत्रण कशासाठी?

पॅलेस्टिनी दहशतवाद्याचे कौतुक करणाऱ्या सुधन्वा देशपांडेंना IIT मध्ये आमंत्रण कशासाठी?

प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याविरोधात विद्यार्थ्यांची पोलिस तक्रार

Google News Follow

Related

डाव्या विचारसरणीच्या सुधन्वा देशपांडे यांना मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या ठिकाणी आमंत्रित करून आयआयटीच्या प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आयआयटी च्या विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी पवई पोलीस ठाण्यात प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांच्यावर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी आपल्या एका प्राध्यापीका विरुद्ध बुधवारी पवई पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे. प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करीत डाव्या विचारसरणीच्या सुधन्वा देशपांडे यांना ६ नोव्हेंबर रोजी आयआयटी मुंबई या ठिकाणी आमंत्रित करून स्वतःच्या पदाचा अयोग्य वापर केल्याचे विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

देशपांडे यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी झकारिया झुबेदीचा गौरव करून आयआयटी मुंबईच्या शैक्षणिक अखंडतेला धोका पोहचवला आहे, हा प्रकार सुरक्षिततेसाठी त्रासदायक असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसानी हे प्रकरण गंभीरपणे घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे.

 

तक्रारीत असे ही म्हटले आहे की, आयआयटी मध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान देशपांडे यांनी गंभीर विधाने केली आहेत. २०१५ मध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी झकारिया झुबेदी यांना भेटल्याचे मान्य करून हिंसाचार आणि सशस्त्र बंडखोरीचा देशपांडे यांनी बचाव करून त्यांचा गौरव केला. झकारिया झुबेदी ही “अल-अक्सा शहीद ब्रिगेड्स, युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन आणि इस्रायलसह विविध सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी दहशतवादी संस्था म्हणून नियुक्त केलेल्या ‘अल-अक्सा शहीद ब्रिगेड्स’ शी संघटनेशी संबंधित आहेत. दहशतवादाच्या असंख्य कृत्यांशी आणि नागरिकांना लक्ष्य करणार्‍या हल्ल्यांशी जोडलेले आहे, ज्यामुळे त्यांची ही संघटना वादग्रस्त झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

मोठे उद्योगपती रोजगार कुठे देतात? छोटे व्यावसायिकच उद्योग देतात!

रेव्ह पार्टीमध्ये सापांची व्यवस्था गायक फाझिलपुरियाने केली!

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला दणका; देशातील हल्ले ६० टक्क्यांनी वाढले

ब्रिटनच्या सुरक्षित देशांच्या यादीत ‘भारत’!

देशपांडे यांनी कार्यक्रमात बोलताना असे सांगितले की,”२०१५ मध्ये मी पहिल्यांदा पॅलेस्टाईनला गेलो होतो. मी दोनदा तिथे गेलो आहे. माझ्या पहिल्या भेटीत, झकेरिया झुबेदी घासन कनाफानी यांना भेटण्याचे भाग्य मला लाभले, असे सांगितले. “मुक्ती मिळविण्यासाठी, आम्हाला बंदुकांची गरज आहे. आपल्याला व्यवसायाशी लढावे लागेल. तुम्हाला माहीत आहे की हा सशस्त्र संघर्ष असावा. पण बंदुका घेऊन जाण्याची संस्कृती नसेल तर बंदुका आपल्यावर उलटतील.

दुसऱ्या शब्दांत, तुम्हाला सांगायचे म्हणजे जर आमच्याकडे बंदुकीची संस्कृती नसेल तर आम्ही एकमेकांना मारायला सुरुवात करू. पॅलेस्टिनी संघर्ष हा एक स्वातंत्र्य लढा आहे असे देशपांडे यांनी कार्यक्रमदरम्यान म्हटले असून जबाबदार नागरिक आणि विद्यार्थी या नात्याने, अशा प्रकारच्या क्रियाकलापांचा तरुण विद्यार्थ्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि दहशतवादाशी संबंधित विचारसरणीचा प्रचार करण्याशी संबंधित संभाव्य सुरक्षा जोखमींबद्दल आम्ही चिंतित आहोत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती अर्जात करण्यात आली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी कडून नुकताच अर्ज दाखल झाला असून याबाबत तपास करण्यात येईल असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा