मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याभोवतीचा फास आता आणखी घट्ट होऊ लागला आहे. केंद्र सरकारच्या कंपनी मंत्रालयाने आता जाधव यांच्याशी संबंधित प्रधान डीलर्स प्रा. लि.च्या संचालकांविरोधात विरोधात मरीन लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत प्रधान डीलर्स प्रा. लि. च्या आजी माजी संचालकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात प्रियेश शांतीलाल जैन, कृपाशंकर महावर, रश्मी सिंघानिया, रिंटु दास, अजित कुमार सिंग, कृष्णा बनवारीलाल तोडी, चंद्रशेखर राणे, सुरेश पुरोहित यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात कंपनी कायद्याच्या ४२०, १२०बी या कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हावा असे म्हटले आहे.
आयकर खात्याने ज्या धाडी यशवंत जाधव यांच्या घरावर घातल्या त्यानंतर त्यांना असे आढळले होते की, जाधव दांपत्याने कोलकाता स्थित हवाला ऑपरेटरला १५ कोटी दिले होते. बॅंकांच्या मार्फत हे पैसे हस्तांतरित करण्यात आले होते.
आपल्या निवडणुक अर्जासोबत देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी ७.५ कोटींची मालमत्ता जाहीर केली होती. तर पतीकडे ४.६ कोटींची मालमत्ता असल्याचेही नमूद केले होते.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात
संजय राऊत यांच्यासाठी शरद पवार भेटले नरेंद्र मोदींना
हिंदू देवीदेवतांचा अवमान; न्यूज नेशनचा पत्रकार वाजिद अलीची हकालपट्टी
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
त्यांनी त्यात प्रधान डीलर्स प्रा. लि. कंपनीकडून १ कोटी कर्ज घेतल्याचेही नमूद केले होते. त्यानंतर या प्रधान डीलर्ससंदर्भात तपास केल्यावर ही शेल कंपनी असल्याचे लक्षात आले. कोलकाता स्थित हवाला ऑपरेटरनेही कंपनी उघडली होती. या ऑपरेटरचे नाव उदय शंकर महावर असे आहे. याच महावरचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
या महावरने प्रधान डीलर्सचे शेअर्स चढ्या भावाने विकत घेतले होते. त्यामुळे कंपनीची भांडवली मूल्य १५ कोटीपर्यंत वधारले. याच महावरची चौकशी आयकर खात्याने केल्यावर त्याने सांगितले की, हवालाच्या माध्यमातून त्याने जाधव यांना १५ कोटी रुपये दिले.