25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामाजगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार

जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार

आंध्र प्रदेशात घडली घटना

Google News Follow

Related

दररोज विचित्र घटना जगभरात घडत असतात. आपल्याला या घटनांचे कधी आश्चर्य वाटते कधी त्यामुळे धक्का बसतो. आंध्र प्रदेशातही अशीच एक घटना घडली. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात देशभरात होत आहे.

एका कुत्र्याने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केला असा आरोप करत म्हणून त्याच्याविरोधात काही महिलांनी पोलिसात तक्रार केल्याची घटना घडली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे एक पोस्टर भिंतीवर लावण्यात आले होते पण एका व्हीडिओत एक कुत्रा हे पोस्टर फाडत असल्याचे पाहिल्यानंतर रेड्डी यांच्या विरोधी पक्षातील महिलांनी थट्टा उडविण्याच्या हेतूने ही तक्रार केली.

विजयवाडा येथे ही घटना घडली. आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष तेलुगू देसम पार्टीच्या कार्यकर्त्या दासरी उदयश्री यांनी ही तक्रार गमतीतून केली आहे. अन्य काही महिला सहकारी कार्यकर्त्यांसह त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन या कुत्र्याची तक्रार केली.

हे ही वाचा:

भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे!

म्हणजे संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले तर…

गौतम नवलाखांच्या आयएसआयशी संबंधांच्या शक्यतेवरून एनआयएने जामीन नाकारला  

देशातील नवीन कोरोना रुग्णांची ११ हजारांच्या पुढे; सक्रिय रुग्णांची संख्येतही लक्षणीय वाढ

मुख्यमंत्र्यांचा अपमान या कुत्र्याने केला आहे, अशा स्वरूपाची ही तक्रार आहे. या घटनेची खिल्ली उडविण्याच्या हेतून ही तक्रार करण्यात आली आहे. दासरी यांनी म्हटले आहे की, आमची मागणी आहे की, या कुत्र्याला अटक व्हायला पाहिजे. शिवाय, ज्यांनी या कुत्र्याला पाठिंबा दिला त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा हा अपमान आहे.

एका भिंतीवर जगनमोहन रेड्डी यांचा हा फोटो स्टीकरच्या स्वरूपात लावण्यात आला होता. त्यावर जगनअण्णा आमचे भविष्य असे तेलुगूत लिहिले होते. राज्यात वायएसआर काँग्रेस पक्षातर्फे जे सर्वेक्षण केले जात आहे त्यानिमित्त हे स्टिकर विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यावरून ही सगळी घटना घडली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा