वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि कुटुंबीय यांच्या संदर्भात रोज नव्याने धक्कादायक खुलासे होत असून त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खेडकर कुटुंबियांची थर्मोव्हेरिटा कंपनी ही अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीने २ लाख ७७ हजार रूपयांचा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने ही कंपनी सील करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच आता ही कंपनीच अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे.
आयएएस पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता रहिवासी पत्ता म्हणून दिला होता. यासंदर्भातले रेकॉर्ड पाहता २००९ पासून कर भरला जात होता, शेवटचा कर २०२२ मध्ये भरण्यात आला होता. त्यानंतर तब्बल २ लाख ७७ हजारांचा थकीत कर आहे. त्यामुळे नियमानुसार, प्रॉपर्टी जप्त करण्याची जी कारवाई आहे, ती सुरू करण्यात आली आहे. याशिवाय रेडझोनमध्ये कंपनी उभारल्यामुळे ती अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
“कंपनी ज्या भागात येते, तो भाग रेड झोनमध्ये येतो, त्यामुळे त्या भागातील सर्व कंपन्या अनधिकृत आहेत. त्यामुळे या कंपनीवर कारवाई केली जाईल. नियमांनुसार, अनधिकृत इमारत असेल, तर संबंधित मालकांना एक महिन्यांची नोटीस दिली जाते. त्यानंतर जी काही योग्य कारवाई असले, ती त्यांच्यावर केली जाते,” अशी माहिती पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
बदलापूरमध्ये ‘चादर गँग’चा धुमाकूळ, टायटनचं शोरूम फोडलं !
तर इम्तियाज जलील यांचे कोल्हापुरी पायताणाने स्वागत केले जाईल….
यूपीएससी नापास, तरीही परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव… ज्योती मिश्राची चक्रावून टाकणारी कहाणी
उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; दिब्रूगड एक्स्प्रेसचे १० डबे घसरले
सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आयएएस पूजा खेडकरांनी केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवलं होतं. मात्र, यासाठी रहिवाशी ऐवजी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा पत्ता त्यांनी वापरला होता. ही कंपनी अनधिकृत असल्याचं देखील आता समोर आलं आहे. त्यामुळे आता खेडकरांच्या कंपनीवर लवकरचं हातोडा पडणार असून पिंपरी पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात झाली आहे.