छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक बाधला

सहकारी पराडकरला पोलिसांनी केली अटक

छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक बाधला

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा वाढदिवस साजरा केल्या प्रकरणी निलेश उर्फ आप्पा पराडकरसह १५ जणांविरुद्ध टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटा राजन याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूर सहकार नगर येथे १३ जानेवारी रोजी एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजे उर्फ नाना हा सध्या तिहार तुरुंगात कैदेत आहे. छोटा राजन याचा १३ जानेवारी रोजी वाढदिवस होता, छोटा राजनच्या चाहत्याकडून अनेक ठिकाणी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली होती,तर अनेक ठिकाणी केक कापून छोटा राजनचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. छोटा राजन याचा बालेकिल्ला समजला जाणारा चेंबूर येथील सहकार नगर, टिळक नगर या ठिकाणी राहणाऱ्या छोटा राजनचा जवळचा सहकारी निलेश उर्फ आप्पा पराडकर याने एका कार्यालयात छोटा राजनचे छायाचित्र असलेला केक कापून वाढदिवस साजरा केला.

हे ही वाचा:

प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये २० उद्योगांशी करणार चर्चा

मुंबईकरांना विक्रमी हुडहुडी

डिमॅट खात्यांच्या संख्येत झाली दणदणीत वाढ

या वाढदिवसाचे व्हिडीओ आणि छायाचित्रे समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. अखेर मुंबई पोलिसांनी याची दखल घेत निलेश पराडकर आणि त्याचे इतर साथीदार असे एकूण १५ जणांविरुद्ध हिसंक गुन्हेगारी कृत्याचे उदत्तीकरण करणे व त्याचेसाठी जाणिवपूर्वक जमाव जमवणे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे हावभाव निर्माण करणे व सदर गोष्टीचे चित्रीकरण करून समाजमाध्यमामध्ये जाणिवपुर्वक प्रसारीत करणे, जेणे करून समाजात कायदा मानणारा जनसमुदाय भयग्रस्त व्हावा व त्यांच्यात असुरक्षिततेची भीतीची भावना निर्माण व्हावी. तसेच सामाजिक ऐक धोक्यात येईल व एकोपा टिकण्यास बाधक होईल या उद्देशाने जाणीवपूर्वक कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसानी दिली आहे.

Exit mobile version