वायनाडमध्ये कॉलेजवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या; डाव्या चळवळीतील संघटनेच्या सहा सदस्यांना अटक

वायनाडमध्ये कॉलेजवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या; डाव्या चळवळीतील संघटनेच्या सहा सदस्यांना अटक

A fabric low poly suicide rope with slipknot placed on the white concrete wall with white space on left. 3D illustration and rendered by program Blender.

थिरुवनंतपूरम येथील नेंदुमांगाड येथील असणारा २० वर्षीय विद्यार्थी जेएस सिद्धार्थ याने १८ फेब्रुवारी रोजी वायनाडमध्ये आत्महत्या केली. डाव्या चळवळीच्या विद्यार्थीनेत्यांनी त्याचा शारीरिक आणि शाब्दिक छळ करून या विद्यार्थ्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या विद्यार्थ्याला सर्वांसमोर नग्न होण्यासही भाग पाडले होते. या प्रकरणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेशी संबंधित सहा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. एसएफआयच्या विद्यार्थी नेत्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलगेट जोशुआ (२३), अभिषेक एस (२३), डॉन्स दायी (२३), आकाश एसडी (२२), रोशन बिनॉय (२०) आणि श्रीहरी आरडी (२३) अशी आरोपींची नावे आहेत.

१८ जानेवारी रोजी वायनाड येथील ‘कॉलेज ऑफ वेटेरिनरी अँड ऍनिमल सायन्स’च्या दुसऱ्या वर्षात शिकणारा जेएस सिद्धार्थ याने कॉलेज टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदनात त्याला मारहाण झाल्याचे आढळून आले आहे. त्याच्या या अनैसर्गिक मृत्यूनंतर कॉलेजच्या रॅगिंगविरोधी समितीने केलेल्या चौकशीत त्याला मृत्यूपूर्वी सहकारी विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचे आढळले. त्यानंतर डाव्या चळवळीशी संबंधित १२ विद्यार्थी नेत्यांना कॉलेजमधून निलंबित करण्यात आले.

निलंबित करण्यात आलेले विद्यार्थी आणि अटक केलेले विद्यार्थी वेगवेगळे आहेत. डाव्या चळवळीशी संबंधित विद्यार्थी सिद्धार्थचा नेहमीच छळ करत असत, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी कॉलेजच्या संघटनेचा अध्यक्ष, संघटनेचा कार्यकर्ता आणि एसएफआय युनिटचा सचिव या एसएएफआयचे नेते आणि सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी

ढाक्यात सातमजली इमारतीला आग; ४३ जणांचा मृत्यू

आयएसआयला गुप्त माहिती दिल्याप्रकरणी बिकानेर फायरिंग रेंजच्या संशयित कॅन्टीन ऑपरेटरला अटक

२० भारतीय अजूनही रशियात, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील!

’१४ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ त्याच्या काही विद्यार्थ्यांसोबत व्हॅलेंटाइन डेच्या कार्यक्रमात नृत्य करत होता. तेव्हा त्याला १०० विद्यार्थ्यांसमोर मारहाण करण्यात आली. या मारहाणीबाबत कोणाला सांगितल्यास त्याला जिवे मारण्यात येईल, अशी धमकी त्याला कॉलेजच्या संघटनेचा सचिव आणि त्याच्या गँगने दिल्याचा दिल्याचा आरोप सिद्धार्थच्या मित्रांनी केला आहे,’ अशी तक्रार सिद्धार्थच्या वडिलांनी केली आहे. त्यानंतर त्याचा अनन्वित छळ करण्यात आला. त्याला मारहाण करण्यात आली. त्याला सर्वांसमोर नग्न करण्यात आले. त्यामुळे त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

Exit mobile version