मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त

मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुजरातमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ५०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गुजरातच्या बंदरावरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिकची चौकशी सुरू आहे.

गुजरातमधील बंदरावर आलेल्या मालवाहू जहाजावरून ५२ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकेनची किंमत ५०० कोटी रुपये आहे. या जहाजात २५ मेट्रिक टनाच्या १००० मिठाच्या बॅग्ज आहेत असा दावा करण्यात आला होता. मात्र, डीआरआयने २४ मे ते २६ मे या काळात केलेल्या तपासणीत मालवाहू जहाजात ५२ किलो कोकेन सापडलं. इराणवरून हे ड्रग्ज आल्याची प्राथमिक माहिती आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन नमकीन’ असे नाव देण्यात आले होते.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भारतातील सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उदघाटन

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान

अमेरिकेच्या कानशिलावर ‘बंदूक’!

मोदी सरकारचे आठ वर्षात,आठ मोठे निर्णय

या मालवाहू जहाजातील मिठाच्या बॅग्ज तपासत असताना काही बॅग्जमधून अधिकाऱ्यांना वेगळा गंध आला. हे मीठ नसल्याचे लक्षात येताच त्या पदार्थाची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. तपासणीत या पदार्थांमध्ये कोकेनची मात्रा असल्याचं समोर आलं. यानंतर केलेल्या जप्तीच्या कारवाईत आतापर्यंत ५२ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून गुजरातमधील बंदरावर वाढलेल्या अंमलीपदार्थ विरोधी कारवायांनंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version