मुंबई विमानतळावरून पाच कोटींचे कोकेन जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विदेशी महिलेला ५ कोटींच्या अमलीपदार्थासह अटक केली आहे.

मुंबई विमानतळावरून पाच कोटींचे कोकेन जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विदेशी महिलेला ५ कोटींच्या अमलीपदार्थासह अटक केली आहे. या विदेशी महिलेकडून ५०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर डीआरआयच्या मुंबई पथकाने पाच आरोपींना सोन्याची तस्करी करताना पकडले आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेनची तस्करी करणाऱ्या सिएरा लिओनियन (५०) या महिलेला अटक केली आहे. कस्टम्सने ही कारवाई केली असून या महिलेकडून तब्बल ५ कोटी रूपयांचे ५०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.

आरोपी महिला इथियोपियातील अदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईत आली होती. तिच्या पर्समध्ये अमली पदार्थ लपवून ठेवलेले कस्टम अधिकाऱ्यांना आढळले. तपासणीवेळी तिच्याकडे ५०० ग्रॅम कोकेन सापडले. या घटनेची माहिती तत्काळ इथियोपियाच्या दूतावासाला देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भाट्ये समुद्रात बोट बुडाली, दोन जण बेपत्ता

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

सोन्याची तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

डीआरआयच्या मुंबई पथकाने पाच आरोपींना सोन्याची तस्करी करताना पकडले आहे. बुधवार, १७ ऑगस्ट रोजी सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन कोटी रुपये किमतीचे साडे चार किलो सोने जप्त केले. कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी तीन वेगवेगळ्या प्रकरणांपैकी एका प्रकरणात तीन प्रवाशांना कालिकत-मुंबई फ्लाइटच्या टॉयलेट आणि सीटमध्ये लपवून सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आली होती. हे तिन्ही प्रवासी शारजाहून मुंबईत आले होते.

Exit mobile version