मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने मोठी कारवाई करत ड्रग्स जप्त केले आहेत

मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने मोठी कारवाई करत ड्रग्स जप्त केले आहेत. या कारवाई दरम्यान तब्बल ९.८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. आदिस अबाबा येथून आलेल्या एका प्रवाशाकडे कोकेन सापडले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी ९८० ग्रॅम वजनाचे तब्बल ९.८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-610 वरून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे. तसेच त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीकडून समन्स

मुस्लिम तरुण नाव बदलून गरब्यात घुसले, तिघांना अटक

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

काही दिवसांपूर्वीच कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावर कारवाई दरम्यान कोकेन जप्त केले होते. २९ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने ४९० ग्रॅम कोकेन घेऊन जाणाऱ्या एका प्रवाशाला पकडले होते. त्याची किंमत ४.९ कोटी रुपये इतकी होती. महिला प्रवाशाने तिच्या सँडलमध्ये बनवलेल्या एका खास छिद्रात कोकेन लपवून आणले होते.

Exit mobile version