महसूल गुप्तचर विभागाकडून ७.८५ कोटी किंमतीचे कोकेन जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई

महसूल गुप्तचर विभागाकडून ७.८५ कोटी किंमतीचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. महसूल गुप्तचर विभागाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी, ७ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून एका प्रवाशाला अटक केली होती. संशयावरून युगांडाच्या एका पुरुष प्रवाशाला महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती.

या संदर्भात प्रवाशाकडे सविस्तर चौकशी केली असता, भारतात तस्करी करण्यासाठी आपण अमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आणि ते शरीरातून वाहून नेत असल्याचे त्याने कबूल केले होते. या प्रवाशाला नंतर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा:

नव्या सहा विमानतळांवर डिजी यात्राची सुविधा मिळणार

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटनाला चालना देणार

श्रीनगर एअरबेसवर मिग- २९ लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रन तैनात

जया प्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास, पाच हजारांचा दंड; काय आहे प्रकरण?

त्यानंतर ७८५ ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण ६५ कॅप्सूल या पुरुष प्रवाशाच्या शरीरातून बाहेर काढण्यात आल्या. ज्याची किंमत ७.८५ कोटी रुपये इतकी आहे. गुरुवार, १० ऑगस्ट रोजी एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये जप्त करण्यात आल्या. या प्रवाशाला एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलमानुसार अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून भारतात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीमध्ये सहभाग असलेल्या या आंतरराष्ट्रीय टोळीच्या इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.

Exit mobile version