पोटात लपलेले ‘रहस्य’ अखेर डीआयआरने शोधलेच!

पोटात लपलेले ‘रहस्य’ अखेर डीआयआरने शोधलेच!

कोकेनची तस्करी करणाऱ्या एका महिलेला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. किटेवाना वर्दाह रमाधानी असे या महिलेचे नाव असून ती टांझानियाची नागरिक आहे.

या महिलेकडून ६५ कॅप्सूल्समधून ८१० ग्रॅम कोकेन ‘डीआरआय’ने जप्त केले आहे. अमलीपदार्थ विमानतळावरील सुरक्षा तपासणीमधून सहज बाहेर आणता येणार नसल्याने आरोपीने ते कोकेन पोटात दडवून आणले होते.

टांझानिया येथील दर इज सलाम येथून एक महिला अमलीपदार्थ घेऊन मुंबईत येणार असल्याची खात्रीलायक खबर ‘डीआरआय’ मिळाली होती. रमाधानी मुंबई विमानतळावर उतरताच ‘डीआरआय’ने तिला अटक केली. जे. जे. रुग्णालयात तिची क्ष- किरण चाचणी केली आणि त्या चाचणीत तिच्या पोटात अमलीपदार्थ असल्याचे उघडकीस आले. तिच्या जवळील एका कॅप्सूलमधून १६० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांच्या उपचारानंतर तिच्या पोटातून कोकेन भरलेल्या ६५ कॅप्सूल्स बाहेर काढण्यात आल्या. प्रत्येक कॅप्सूलमध्ये १० ग्रॅम असे ६५० ग्रॅम कोकेन महिलेच्या पोटातून काढण्यात आले.

हे ही वाचा:

अनधिकृत बांधकामांचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट

चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!

राज्यात पुन्हा बरसणार जलधारा

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

अशाच एका आरोपीला एनसीबीच्या पथकाने दोन दिवसापूर्वी अटक केली होती. फुमो इमॅन्युअल झेडेक्युअस असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १० कोटी रुपयांचे एक किलो ५० ग्रॅम कोकेन जप्त केले होते. गेल्या वर्षभरात ‘डीआरआय’ मुंबईच्या पथकाने कोकेन, हिरॉईन, एमडी, केटामाईन असे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. २०२०- २१ मध्ये या पथकाने ६४० कोटी रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत केले आहेत.

Exit mobile version