नवी दिल्ली येथून एका परदेशी महिलेला विमानतळावरून अटक केले आहे. त्या महिलेकडे तब्बल ८२ कोकेनने भरलेल्या कॅप्सूल आढळल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, त्या महिलेने शरीरामध्ये कोकेनच्या कॅप्सूल लपवल्या होत्या.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गिनी देशातील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले होते. ही महिला ग्रीन चॅनल पार करून इंटरनॅशलच्या दाराबाहेर पडण्यासाठी त्या दिशेने येत होती. या महिलेवर शंका आल्याने अधिकाऱ्यांनी या महिलेची चौकशी केली. महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने चौकशीमध्ये शरीरात कोकेन लपविल्याचे कबूल केले.
यानंतर अधिकाऱ्यांनी तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केले, या ठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासात तिच्या शरीरात काही गोष्टी असल्याचे आढळून आले. त्यानंतर महिलेच्या शरीरातून ते कॅप्सूल हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. वैद्यकीय प्रक्रियेतंर्गत डॉक्टरांच्या देखरेखेखाली महिलेच्या शरीरातून या कोकेनच्या कॅप्सूल काढण्यात आल्या आहेत.
या कॅप्सूलची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १५.३६ कोटी रूपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या महिलेविरूद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा :
‘आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार’
राज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका
बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं
घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार
विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२ कॅप्सूलमधूल एकूण १ हजार २४ ग्रॅम सफेद पावडरीचा चुरा बाहेर काढण्यात आला. त्याची चौकशी केली असताना ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेविरूद्ध अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.