परमबीर सिंग यांच्या निलंबन आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

परमबीर सिंग यांच्या निलंबन आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या निलंबनाचा आदेश आता जारी करण्यात येईल. परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी झाली असून पुढील कारवाईसाठी ही फाईल राज्याच्या गृहविभागाकडे पाठवली जाणार आहे. भ्रष्टाचार आणि अनियमिततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या फाइलवर स्वाक्षरी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांच्यावरील आयएएस अधिकारी देबाशीश चक्रवर्ती यांच्या अहवालाचा स्वीकार केला आहे. चक्रवर्ती यांनी नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली परमबीर सिंग यांची चौकशी केली होती. शिवाय, राज्याच्या गृह खात्याने प्रशासकीय चुकांसाठी त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू केली होती.
तत्पूर्वी, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल परमबीर सिंग यांच्याविरोधात कारवाई
केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले होते. “परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचार आणि अनियमिततेबद्दल त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे,” असे गृहमंत्री म्हणाले होते.

मार्च २०२० मध्ये परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले होते. आपल्या आरोपात त्यांनी म्हटले होते की, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या तो याच प्रकरणात तुरुंगात आहे.

न्यायमूर्ती एस के कौल आणि एम एम सुंदरेश यांच्या खंडपीठाने परमबीर यांच्या याचिकेवर राज्य सरकार, पोलिस महासंचालक संजय पांडे आणि सीबीआय यांना नोटिसा बजावल्या आणि ६ डिसेंबरपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, कोर्टाने परमबीर यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिंग यांना तपासाला सहकार्य करण्याचा आदेश दिला आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!

शिंझो आबे यांनी दिला चीनला ‘हा’ इशारा

ओमिक्रॉनचा भारतात प्रवेश; कर्नाटकमध्ये आढळले ओमिक्रॉनचे दोन रुग्ण

पेन्टोग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकल्याने पश्चिम रेल्वे रखडली

 

सात तासांच्या चौकशी अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंग यांनी आपण अजूनही चंदीगडमध्ये असल्याचे सांगितले होते. लवकरच मुंबईतील तपास यंत्रणांसमोर हजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास तो थेट विमानतळावरून कांदिवली येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचला होता.
सहा महिन्यांनंतर मुंबईला परतलेल्या परमबीरला मनी लाँडरिंग प्रकरणात फरार घोषित करण्यात आले. सहा महिने फरार राहिल्यानंतर अखेर तो नुकताच मुंबई पोलिसांकडे परतला आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची सात तास चौकशी केली आहे.

Exit mobile version