मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांना ईडीकडून अटक

त्यांच्या घरातून दोन एके 47 जप्त करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांना ईडीकडून अटक

अवैध खाण प्रकरणी बुधवारी ईडीने रांचीमध्ये छापे टाकले. या छाप्यात ईडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांना अटक केली आहे. बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित एका प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत प्रेम प्रकाश यांना अटक केली असून, त्यांच्या घरातून दोन एके 47 जप्त करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात अद्याप ईडीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

रांची येथील प्रेम प्रकाश यांच्या घरावर सकाळी ६ वाजता सुरू झालेले छापे रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे १८ तास चालले. ईडी प्रेम प्रकाश यांची गुप्त ठिकाणी चौकशी करत आहे. याशिवाय सासाराम येथील प्रेम प्रकाशच्या नातेवाईकांच्या दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

या छाप्यात अनेक कागदपत्रे सापडली आहेत. त्यांच्या घरातून दोन एके 47 रायफल, मॅगझिन आणि ६० गोळ्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही एके 47 रांची पोलिसांच्या असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.तपासानंतर बाहेर आल्यावर अर्गोरा एसएचओने कबुली दिली की शस्त्रे रांची पोलिसांची आहेत. याप्रकरणी दोन हवालदारांनाही निलंबित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी

सोनाली फोगाट यांची हत्या झाल्याचा दावा

अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

यापूर्वी २५ मे रोजीही प्रेम यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यानंतर २६ मे रोजी ईडीने प्रेमला चौकशीसाठी बोलावले. प्रेमप्रकाश यांची नेते आणि अधिकाऱ्यांशी असलेली जवळीक नेहमीच चर्चेत असते.

Exit mobile version