23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामाबोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख

बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

गेट वे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोटीला नौदलाची स्पीड बोट धडकून १३ जणांचा मृत्यू झाला. यात नौदलाच्या बोटीतील तीन जणांचा समावेश आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

फडणवीस म्हणाले की, मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेमुळे ही प्रवासी बोट कलंडली. घटनेत सायं. ७.३० पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी १०१ लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी ७.३० पर्यंत १३ जणांना मृत घोषित केले आहे. यात ३ नौदलाचे जवान असून १० नागरिक आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. २ गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिले निमंत्रण!

फरार विजय मल्ल्याची मालमत्ता विकून १४ हजार कोटी केले वसूल!

सत्तेच्या उबेत असलेले रिकाम्या हातांचे मुके घेतील कशाला?

७६५ बळींचा मानकरी अश्विनचा क्रिकेटला अलविदा!

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉफ्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा