कोव्हिडं काळात झालेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची चौकशी करण्यात आली. पारेख यांचा या प्रकरणात जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
कोव्हिडं काळात रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी प्रकरणी मे आणि जून २०२०मध्ये महापौर बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी संबधित डॉक्टर यांच्यासमवेत पुण्य पारीख हे देखील हजर होते.
या बैठकीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी कंत्राट देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता, कंत्राट कुणाला द्यायचे व कुणाला देऊ नये याबाबत निर्णय घेण्यात आला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हे ही वाचा:
महाराष्ट्र महिलांसाठी पूर्ण सुरक्षित!
चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला मेजर ध्यानचंद तर शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर!
एकनाथ शिंदेंची अधिवेशनात तुफान फटकेबाजी; विरोधक क्लीन बोल्ड
कंगना रनौत लोकसभेच्या मैदानात उतरणार
रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदीमध्ये मोठी तफावत आढळून आली होती, इंजेक्शनचे दर वाढवून लावन्याय आले होते. ६५० रुपयांचे इंजेक्शन १,५६८ रुपयांना खरेदी करण्यात आले होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्या संबंधी बुधवारी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले करणारे पुण्य पारेख यांना चौकशी कामी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखाने त्यांची चौकशी करून यासंबधी पारेख यांचा जबाब नोंदवला आहे.