एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याच्या प्रकरणात दिल्लीतील मशिदीच्या एका मौलवीला अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी कारवाई करताना या ४८ वर्षीय मौलवीला अटक केली. मूळच्या भरतपुर, राजस्थान येथून असणाऱ्या या मौलवीवर एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप आहे.
गाजियाबाद परिसरातील लोणी जिल्ह्यात हा मौलवी लपून बसला होता. दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत लोणी येथे जाऊन या मौलवीला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बालक लैंगिक कृत्ये संरक्षण कायदा अर्थात पॉस्को कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर या मौलवीला स्थानिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘तुझ्या बापाला’…किशोरी पेडणेकरांची जीभ घसरली
ट्विट डिलिट केले तरी महापौरांची असभ्य अक्षरं कोरली गेली आहेत
अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
काय आहे प्रकरण?
रविवारी संध्याकाळी बारा वर्षाची एक अल्पवयीन मुलगी पाणी भरण्यासाठी दिल्ली येथील एका मशिदीत गेली होती. पाणी भरणाऱ्या त्या निरागस मुलीवर त्या मशिदीच्या मौलवीची नजर पडली. त्या ४८ वर्षाच्या मौलवीने अतिशय क्रूरपणे तिच्यावर अतिप्रसंग केला. घरी परतल्यावर त्या पिडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी दिल्ली पोलिसात त्या मौलवी विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मौलवी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे आणि या मौलवीला अटक करण्यात आली आहे.