इस्लाम धर्म स्वीकारल्यास ‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ असे सांगत एका महिलेला उत्तर प्रदेशातील एका मौलवीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास दबाव आणल्याची घटना समोर अली आहे.या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून मौलवीला अटक केली आहे. महिलेच्या मुलाने तक्रार दाखल केल्यांनतर मौलवीला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे.भूत-प्रेत, आत्मा या वाईट शक्तींपासून सुटका करायची असेल तर इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल,असे सांगत उत्तर प्रदेशातील मौलवीने एका महिलेला घाबरवत इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला, असे पोलिसांनी सांगितले.महिलेचा मुलगा अक्षय श्रीवास्तव (३५) याने मौलवी सरफराजविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू!
ट्रॉफीवर पाय ठेवल्याने मार्शवर शामीची टीका!
अमेरिकेत हिंदू धर्मासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारा भारतीय!
त्याच्या तक्रारीत त्याने पोलिसांना सांगितले की, त्याची आई मीनू (४५) ही २०१७ पासून काही मानसिक आणि शारीरिक आजारापासून त्रस्त आहे.काही लोकांच्या सल्ल्यानुसार मीनू या महिलेने मौलवींची मदत घेतली होती.मुलाने सांगितल्यानुसार, आईने मौलवींच्या सांगण्यावरून घरातील हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आणि चित्रे काढून टाकली.तसेच घरातील इतर कुटुंबीयांवर इस्लामचा स्वीकार करण्यासाठी दबाव आणला.
या प्रकरणी एसीपी नंदग्राम रवी कुमार सिंह यांनी सांगितले की, मौलवी सरफराज याला तिहेरी विभागातील मोर्टी या गावातून अटक करण्यात आली आहे.अटक केल्यांनतर चौकशी केली असता, मौलवी सरफराजने सांगितले की, तो गेल्या आठ वर्षांपासून या भागात भूतविद्या करत होता.आजारी लोकांना भुताच्या भीतीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचे काम करत असल्याचे मौलवीने सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.मौलवी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत, असे एसीपी नंदग्राम रवी कुमार सिंह यांनी सांगितले.