27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाहायवेवर लूटमार करणाऱ्या सहा क्लिनअप मार्शलना बेड्या

हायवेवर लूटमार करणाऱ्या सहा क्लिनअप मार्शलना बेड्या

Google News Follow

Related

मुंबईत क्लिन-अप मार्शलकडून लूट होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नियमांचा बडगा दाखवत कारवाईच्या नावाखाली सामान्य नागरिक, वाहन चालक, व्यवसायिकांकडून क्लिन-अप मार्शल यांच्याकडून शहरात लूट सुरू आहे. एमआयडी पोलिसांनी चार क्लिन-अप मार्शलना खंडणी प्रकरणी अटक केल्याच्या घटनेला आठवडा उलटत नाही तोच मुलुंडच्या नवघर पोलिसांनी गुरुवारी ६ क्लिन-अप मार्शलच्या एका टोळीला अटक केली आहे. ही टोळी पूर्व द्रुतगती महामार्गावर (हायवे) वाहन चालकांना अडवून क्लिन-अपच्या नावाखाली लूटमार करीत होती, अशी माहिती पोलिसांनी  दिली आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे अपरिपक्व

चंद्रपूरच्या तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट, दारू बंदी उठवली

पवारांना बारा बलुतेदारांची नाही, गोवंश हत्या सुरु ठेवण्याची चिंता

अर्थगुरू आशीष चौहान आता अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती

सूरज पांडे, निखिल कलकुथे, जितेंद्र दरवेशी, प्रवीण कारंडे,रोहन खराटे, दीपेश घोलप अशी अटक करण्यात आलेल्या  क्लिन-अप मार्शलची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या  क्लिन-अप मार्शल यांची नेमणूक मुंबई महानगरपालिकेच्या टी विभागावाकडून करण्यात आली होती. ही टोळी पूर्व द्रुतगती महामार्ग मुलुंड आणि ऐरोली टोल नाका या ठिकाणी थांबून ट्रक, तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांना अडवून कधी क्लिन-अपच्या नावाखाली तर कधी मास्क घातले नाहीत असे सांगून दोन ते तीन हजार रुपये उकळत होती.

याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर नवघर पोलीसानी ऐरोली या ठिकाणी सापळा रचून या सहा क्लिन-अप मार्शलच्या टोळीला ट्रक चालकांकडून बळजबरीने पैसे उकळत असताना अटक करण्यात आली. या सहा जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा