१० वर्षांच्या मुलांनी वर्गमित्रावर कंपासने केला जीवघेणा हल्ला!

मध्य प्रदेशातील इंदूरमधील घटना

१० वर्षांच्या मुलांनी वर्गमित्रावर कंपासने केला जीवघेणा हल्ला!

मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका खाजगी शाळेत झालेल्या भांडणाच्या वेळी इयत्ता ४ मधील एका विद्यार्थ्यावर त्याच्या तीन वर्गमित्रांनी भूमितीच्या कंपासने १०८ वेळा हल्ला केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली.बाल कल्याण समितीने (CWC) या घटनेची दखल घेतली आणि पोलिसांकडून तपास अहवाल मागवला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

बाल कल्याण समिती अध्यक्षा पल्लवी पोरवाल यांनी सांगितले की, २४ नोव्हेंबर रोजी एरोड्रोम पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका खाजगी शाळेत झालेल्या भांडणात विद्यार्थ्यावर त्याच्या वर्गमित्रांनी भूमितीच्या कंपासने १०८ वेळा हल्ला केला होता.हे प्रकरण धक्कादायक आहे.इतक्या लहान वयातील मुलांच्या हिंसक वर्तनाचे कारण शोधण्यासाठी आम्ही पोलिसांकडून तपास अहवाल मागवला आहे.बाल कल्याण समिती या घटनेसंदर्भात मुले आणि त्यांच्या पालकांना सल्ला देण्याचे काम करणार आहे. तसेच ही मुले हिंसक दृश्ये असणारी व्हिडिओ गेमच्या संपर्कांत तर नाहीत ना, याचा शोध देखील घेणार असल्याचे पोरवाल यांनी सांगितले.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका!

नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

अमेरिकेतील भारतीय राजदूताला खलिस्तानी समर्थकांची धक्काबुक्की!

हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!

२४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास शाळेत झालेल्या हल्ल्यात मुलगा जखमी झाल्याचे पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले.पीडित मुलगा अतिशय घाबरला होता, असे देखील त्याच्या वडिलांनी सांगितले.माझ्या मुलाने घरी आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.पीडित मुलाचे वडील म्हणाले की, मला अजूनही काळात नाही की, त्याच्या वर्गमित्रांनी त्याला अशी वागणूक का दिली.

शाळा व्यवस्थापकाकडून मला वर्गातील सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेले नाहीत, ते पुढे म्हणाले.या घटनेबाबत एअरोड्रोम पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सिंह चौहान यांनी सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.या घटनेत सहभागी असलेले सर्व विद्यार्थी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असून, योग्य ती कायदेशीर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.

 

Exit mobile version