उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!

मारहाणीचा व्हिडिओ केला शेअर

उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!

उत्तर प्रदेशातील झाशी येथे दहावीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी मारहाण केली, पीडित विद्यार्थ्याला विवस्त्र केले आणि दारू पिण्यास भाग पाडले, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.पीडित विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी शहरातील एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले आणि त्याला जबर मारहाण करत त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो नंतर ऑनलाईन शेअर केला,असे पोलिसांनी सांगितले.मारहाणीच्या व्हिडिओमध्ये पीडित विद्यार्थी हल्ला थांबवण्याची विनंती करत असल्याचे दिसत आहे.

विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी संध्याकाळी पीडित विद्यार्थी आपल्या एका वर्गमित्रासह शहरातील एका उद्यानात बसला होता.थोड्यावेळाने तेथे त्याच्या वर्गमित्रांचा एक गट पीडित विद्यार्थ्याजवळ आला.कारमधून आलेल्या चार विद्यार्थ्यांच्या गटाने पीडित विद्यार्थ्याला गाडीत ओढले.आणि त्याला मौरानीपूर रोडजवळील जंगलात नेले.त्यानंतर त्याचे आणखी दोन मित्र तेथे आले.या टोळक्याने विद्यार्थ्याला दारू पिण्यास भाग पाडले आणि नंतर त्याचे कपडे काढण्यास भाग पाडून व्हिडिओ रेकॉर्ड केला.त्यानंतर आरोपी विद्यार्थांनी मिळून पीडित विद्यार्थ्याला काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, असे तक्रारीत नमूद केले आहे.

हे ही वाचा:

प्रशांत कारुळकर यांना मेजर जनरल विक्रांत नाईक यांच्याकडून सन्मानचिन्ह

शपथ पूर्ण झाली, ५०० वर्षांनंतर क्षत्रिय घालणार पगडी आणि चामड्याचे जोडे!

उत्तर प्रदेशमध्ये पक्षही उभा रहात नाही आणि निवडणूकही जिंकत नाही

संसद भवनाची सुरक्षा आता ‘सीआयएसएफ’ करणार

मी त्यांच्यासमोर हात जोडून विनवणी करत राहिलो आणि माफी मागत राहिलो, पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि सुमारे एक तास मला मारहाण केली.त्यांनी मोबाईलवर माझे व्हिडिओही बनवले,असे विद्यार्थ्याने तक्रारीत नमूद केले आहे.मात्र, पीडित विद्यार्थी पळून जाण्यात यशस्वी झाला आणि घरी पोहोचला.

उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले.मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटली असून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे पोलीस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले.

 

Exit mobile version