28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरक्राईमनामाहरियाणाच्या नूहनंतर हिंसाचाराची झळ गुरुग्रामपर्यंत!

हरियाणाच्या नूहनंतर हिंसाचाराची झळ गुरुग्रामपर्यंत!

वाहनांची जाळपोळ, दगडफेक

Google News Follow

Related

हरियाणाच्या नूहमध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेक आणि गाड्यांना आग लावण्यात आली होती. त्यात दोन पोलिसांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. तर, सुमारे डझनभर लोक जखमी झाले. हा हिंसाचार आता गुरुग्रामपर्यंत पसरला असून तिथे वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि इतर नेत्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.  

गुरुग्राममधील सोहना रोडजवळ दोन समुदायातील आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. संघर्षादरम्यान तीन वाहनांचे नुकसान झाले, तर एक गाडी पेटवून देण्यात आली. सोहना रोड महामार्गालगत. गुरुग्राममध्ये झालेल्या हिंसक निषेधादरम्यान दगडफेक, घोषणाबाजी आणि जाळपोळ झाल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.

हे ही वाचा:

मुसेवाला हत्येचा कट रचणारा सचिन थापन पोलिसांच्या ताब्यात ! लवकरच भारतात आणणार

६००० गुन्हे दाखल पण ७ जणांनाच अटक का?

केरळचे सात पर्यटक इस्रायलमध्ये बेपत्ता; बेकायदा स्थलांतराचा संशय

पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत

परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिस दल आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. गुरुग्रामचे उपायुक्त निशांत कुमार यादव यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. आदल्या दिवशी, हरियाणाच्या नुह शेजारील गुरुग्राममध्ये धार्मिक मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली आणि गाड्यांना आग लावण्यात आली. हरियाणाच्या नूह जिल्ह्यात जमावाने विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीला रोखण्याचा प्रयत्न केल्याने दोन होमगार्डवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि सुमारे डझनभर पोलिस जखमी झाले.  

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिमबहुल नूह जिल्ह्यात जमावाने दगडफेक केली आणि गाड्या पेटवल्या. या घटनेनंतर, नूहमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आणि खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवा २ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ब्रज मंडळ यात्रेवर दगडफेक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा