पोलिसांकडून बळाचा वापर; पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट

जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी

पोलिसांकडून बळाचा वापर; पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करून त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी झाली.
बुधवारी नवी दिल्लीत दिवसभर पाऊस पडत असल्याने आंदोलकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनस्थळी झोपण्यासाठी झोपण्यासाठी गाद्या आणि खाटांची मागणी केली होती. मात्र दिल्ली पोलिसांच्या एका गटाने संध्याकाळी उशिरा आंदोलकांना लक्ष्य केल्याचा आरोप आंदोलक कुस्तीपटूंनी केला आहे.

आंदोलनस्थळी कुस्तीपटूंसाठी ‘फोल्डेबल बेड’ आणल्याप्रकरणी ‘आप’चे आमदार सोमनाथ भारती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते परवानगीशिवाय आंदोलनस्थळी पोहोचल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ भारती यांनी जंतरमंतर येथील निषेधाच्या ठिकाणी फोल्डिंग बेड आणले. त्यांनी यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याने आम्ही त्यांना मनाई केली. त्यामुळे आंदोलक कुस्तीपटूंच्या काही समर्थकांनी ट्रकमधून बेड काढण्याचा प्रयत्न केला आणि यावरून बाचाबाची झाली. या प्रकरणी ‘आप’चे आमदार सोमनाथ भारती यांच्यासह इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती!

कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणुक आयोगाची नोटीस

चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या

‘द केरला स्टोरी’ विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पोलिसांनी हल्ला करून शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलक कुस्तीपटूंनी केला आहे. कुस्तीपटू गीता फोगटनेही पोलिसांशी झालेल्या भांडणात तिची भावंडे जखमी झाल्याचा आरोप केला आहे. व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये, दिल्ली पोलिस अधिकारी आणि आंदोलक एका खाटावर वाद घालताना दिसत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांशी झटापट झाल्यानंतर लगेचच पत्रकार परिषदेत कुस्तीपटू विनेश फोगट यांनी आरोप केला की, नशेत असलेल्या दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलक कुस्तीपटूंना लक्ष्य करून त्यांना त्रास दिला. तर, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी ‘आंदोलकांना संपूर्ण देशाच्या पाठिंब्याची गरज आहे, प्रत्येकाने दिल्लीत यावे. पोलिस आमच्या विरोधात बळाचा वापर करत आहेत, महिलांविरोधात गैरव्यवहार करत आहेत आणि बृजभूषणविरोधात मात्र काहीही करत नाहीत,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

Exit mobile version