श्रीनगरच्या दाचीगाम जंगलात चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

भारतीय लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांची संयुक्त कारवाई

श्रीनगरच्या दाचीगाम जंगलात चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. श्रीनगरच्या दाचीगाम जंगलात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून सध्या ऑपरेशन चालू आहे.

गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी हरवन, श्रीनगर येथे संयुक्त ऑपरेशन सुरू केले होते. शोध सुरू असताना दहशतवाद्यांशी प्राथमिक संपर्क प्रस्थापित झाला. यानंतर २ डिसेंबर रोजी चकमक सुरू झाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले असून पुढील अधिकच्या माहितीची प्रतीक्षा आहे.

यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी बारामुल्ला पोलिसांनी सुरक्षा दलांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील कुंजेर भागात दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केला. बारामुल्ला पोलीस, बडगाम पोलीस आणि ६२ आरआर यांनी पोलीस स्टेशन कुंझरच्या अखत्यारित असलेल्या माळवा गावाला लागून असलेल्या जंगलात संयुक्त कारवाई सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान, पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आणि लपण्याचे ठिकाण देखील नष्ट केले.

हे ही वाचा:

‘फेंगल’चा तडाखा; ४० टन वजनाचा दगड कोसळून सात जणांचा मृत्यू

एकनाथ शिंदेंशी कोणतेही मतमतांतर नाही…आमचा शपथविधी दिमाखदार होईल

अजित पवार महायुतीत नसते तर?

मेट्रिमोनियल वेबसाईटवर राहुल नाव सांगून मोहम्मद हुसैनने तरुणीवर केले लैंगिक अत्याचार

यापूर्वी ९ नोव्हेंबर रोजी, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत गुप्त माहितीच्या आधारे सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी राजपुरा, सोपोर, बारामुल्ला या सामान्य भागात संयुक्त ऑपरेशन सुरू केले. जवानांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या आणि त्यांना आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सैन्याने प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. ६ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांनी बांदीपोरा येथील ऑपरेशन कैतसानमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला. 2 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवादी मारले होते.

Exit mobile version