सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!

पोलिसांकडून लाठीमार

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!

कानपूरमधील पोस्टमार्टम हाऊसवर मंगळवारी वेगळेच नाट्य बघायला मिळाले. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृतदेहाजवळ एक तांत्रिक झोपला आणि तरुणाला जिवंत करण्याचा दावा केला. दोन तासांहून अधिक वेळ तांत्रिक मृतदेहाच्या बाजूला पडून राहिला, मात्र काहीच झाले नाही. अखेर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काठी उगारून तांत्रिकाला उठवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

घाटमपूर भैरमपूरचा रहिवासी असणाऱ्या ४५ वर्षीय रामबाबू याचा सोमवारी दुपारी संशयास्पद परिस्थितीत शेतात मृत्यू झाला. नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तेथे त्याचा मृत घोषित करण्यात आले. सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा दावा करून नातेवाइकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शवविच्छेदनाची वेळ संपल्याचे सांगत मृतदेह ताब्यात घेऊन हैलट रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेह ठेवला. मंगळवारी दुपारी १२ वाजता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवागृहाच्या बाहेर काढले.

हे ही वाचा:

गुजरात राज्याचा राज्य मासा म्हणून ‘घोळ’ माशाची निवड!

राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!

खर्गे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी देशासाठी प्राण दिले’!

इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!

या दरम्यान मृताचे नातेवाईक एका तांत्रिकाला घेऊन पोहोचले. तांत्रिकाने तरुणाला जिवंत करण्याच दावा केला आणि त्याच्या शेजारी जाऊन झोपला. या तांत्रिकाचीही कोणतीही हालचाल होत नव्हती. अशाच अवस्थेत दोन तास उलटले. एका मृतदेहाच्या बाजूला तांत्रिक झोपल्याचे वृत्त आजूबाजूच्या परिसरात पोहोचताच लोकांची गर्दी जमू लागली. अनेकजण चमत्काराच्या अपेक्षेने व्हिडीओ बनवू लागले. मात्र तांत्रिकाला झोपून अडीच तास उलटल्यानंतर बघ्यांच्या सहनशीलतेचा अंत होऊ लागला होता. पोस्टमार्टमला उशीर होत असल्याने पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तांत्रिकाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठला नाही. जमिनीवर काठी मारत त्याला जेव्हा उठवण्यात आले, तेव्हा तो संतापला. अखेर पोलिसांनी सक्तीने मृतदेह सील करून शवविच्छेदनासाठी पाठवला.

Exit mobile version