सिने समीक्षक के. आर. के ला मुंबईत अटक

ट्वीट करत सलमान खानवर आरोप

सिने समीक्षक के. आर. के ला मुंबईत अटक

अभिनेता आणि सिने समीक्षक कमाल आर. खान म्हणजेच के. आर. के. हा त्याच्या समीक्षा देण्याच्या विशिष्ट शैलीसाठी नावाजलेला आहे. के. आर. के. याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. के. आर. के. याला मुंबई विमानतळावरून अटक केली असल्याची माहिती त्याने स्वतः एक्स या सोशल मीडिया साईटवरून दिली आहे.

के. आर. के. हा फिल्म समीक्षक म्हणून लोकप्रिय आहे. तो अनेकदा बॉलिवूड सिनेमांची विडंबनात्मक समीक्षा करत असतो. दरम्यान, अभिनेता आणि चित्रपट निर्माता के. आर. के. याला २०१६ च्या एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आल्याची माहिती आहे. के.आर.केने आपल्या एक्स हँडलवरून ही बातमी शेअर केली आहे.

के. आर. के. याने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “मी गेल्या एक वर्षापासून मुंबईत आहे आणि मी माझ्या सर्व न्यायालयीन तारखांना नियमितपणे उपस्थित राहतो. आज मी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दुबईला जाणार होतो. पण मुंबई पोलिसांनी मला विमानतळावर अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी २०१६ च्या एका प्रकरणात वॉन्टेड आहे.” त्यानंतर के. आर. के याने पुढे बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा उल्लेख करत म्हटलं आहे की, “सलमान खान म्हणत आहे की, त्याचा ‘टाईगर-३’ हा चित्रपट माझ्यामुळे फ्लॉप झाला आहे. पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात कोणत्याही परिस्थितीत माझा मृत्यू झाला तर तुम्हा सर्वांना कळले पाहिजे की तो खून आहे. आणि तुम्हाला माहित आहे, यासाठी कोण जबाबदार आहे!” असे ट्वीट के. आर. के. याने केले आहे.

हे ही वाचा:

गिर्यारोहिका शर्विकाने सहाव्या वर्षी १०० किल्ले सर करत रचला विक्रम

इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार

चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!

अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली

के. आर. के. याला कायदेशीर अडचणींचा सामना करण्याची आणि अटक होण्याची ही पहिलीच वेळ नसून २०२२ मध्ये त्याला दोनदा अटक करण्यात आली होती. सुरुवातीला, दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल कथित वादग्रस्त ट्विट शेअर केल्याबद्दल त्याच्यावर आरोप झाले. नंतर सप्टेंबरमध्ये, त्याला पुन्हा अटक करण्यात आली, यावेळी त्याच्या फिटनेस ट्रेनरवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

Exit mobile version