मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात परमबीर सिंग यांचा सीआयडीने जबाब नोंदवला असून उद्या त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात जबाब नोंदवण्यासाठी सीआयडी कार्यालयात पुन्हा बोलवण्यात आले आहे.
होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग हे सोमवारी सकाळी न्या. चांदीवाल आयोगासमोर उपस्थित राहून त्यांनी जमीनपात्र वॉरंट रद्द करून घेतले आहे. आयोगाने त्याना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावून दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत एका आठवड्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे. या दरम्यान परमबीर सिंग आणि अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे हे आयोगासमोर समोरासमोर आले होते, दोघांमध्ये चर्चा देखील झाली मात्र दोघात काय चर्चा झाली याबाबत कळू शकले नाही.
सिंग आणि वाझेच्या समोरासमोर भेटीचे आणि त्याच्यात झालेल्या बातचीत बाबत प्रसारमाध्यमामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान न्या. चांदीवाल आयोगाच्या चौकशी नंतर परमबीर सिंग हे थेट सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे असलेल्या सीआयडी कार्यलायत दाखल झाले होते. सीआयडीने परमबीर सिंग यांची पाच तास चौकशी करून मरीन ड्राईव्ह प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला
वादग्रस्त पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती गंभीर
शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची ‘कोरिओग्राफी’
या वयात ही परिस्थिती पाहावी लागल्याने निराशेतून पवारांचे ‘ते’ विधान
उद्या ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात सिंग यांना चौकशीसाठी पुन्हा बोलवण्यात आले आहे.