पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत

पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत

तब्येत बरी करण्याच्या नावाखाली आणि पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या एका ढोंगी ख्रिस्ती धर्म प्रचारकाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश मधील महोबा भागात हा प्रकार घडला आहे. आशिष जॉन असे या ख्रिस्ती धर्म प्रचारकाचे नाव आहे. विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात लक्ष घालून भोंदू आशिष जॉन वर कारवाई करवून आणली आहे.

धर्मांतराच्या या प्रकरणाबाबत विश्व हिंदू परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसत आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेशच्या धर्मपरिवर्तन विरूद्ध अध्यादेश २०२० या कायद्याच्या कलम ३ आणि कलम ५ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

हे प्रकरण सचिन त्रिवेदी नामक एका तरूणाशी संबंधित आहे. महोबाच्या पानवारी पोलीस स्टेशन परिसरातील ठाकूरदास मोहल्ला येथे सचिन वास्तव्यास आहे. सचिन अनेक दिवसांपासून आजारी होता. सचिनच्या या आजारपणाबद्दल ख्रिश्चन धर्माचा प्रचारक असलेल्या आशिष जॉन याला माहित पडले. ही माहिती कळताच आशिष जॉन याने आजारातून बरे करण्याच्या आणि व्यवसायासाठी पैसे देण्याच्या नावाखाली सचिनला आमिष दाखवून धर्मांतराबाबत दबाव आणत होता.

हे ही वाचा:

शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?

ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे

आणखीन एका बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला…नराधम अटकेत

भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री! मोदी-शहांचे धक्कातंत्र कायम

एक महिन्यापूर्वी सचिन जेव्हा पनवारी शहराच्या हरपालपूर चौकावर चहा पीत होता तेव्हा आशिष जॉन त्याला भेटला. जॉन हा बलिया उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याने एका ग्लास पाणी घेऊन त्या पाण्यात काहीतरी ठेवले आणि सचिनला दिले. त्यानंतर सचिनला सांगितले की आता तुझी डोकेदुखी आहे ती ठीक होईल. पाणी पिल्यानंतर सचिनला आराम वाटला. त्याने जॉनचे आभार मानले.

पण मग आशिष जॉन म्हणाला की तुला येशू स्वीकारावा लागेल. त्याने माझ्यावर दबाव टाकला. माझ्या नकारावर, आशिष सर्व प्रकारच्या मार्गांनी प्रलोभन देऊ लागला. सचिनने त्याला स्पष्ट नकार दिला. पण तरीही आशिष जॉन सहमत नव्हता. सचिनने ख्रिस्ती धर्म स्वीकारायला हवा म्हणून तो सचिनच्या घरी गेला. आशिषने सचिनचे मन विचलित केले. त्याला म्हणाला की ‘आज तू बेरोजगार आहेस, तुझ्याकडे पैसे नाहीत, पण जर तू ख्रिस्ती धर्म स्वीकारलास तर तुला १२,००० रुपये दर महा दिले जातील.’ त्यासोबतच आशिषने अनेक येशूची धार्मिक पुस्तके देऊ केली आणि माझ्याबरोबर ये असे सांगितले.

जर तू नकार दिलास तर तुझा नाश होईल, सचिनचा मोबाईल नंबर घेतला आणि म्हणाला की मी तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतो. या सर्व गोष्टींनी सचिन व्यथित होऊन त्याने विश्व हिंदू परिषदेच्या लोकांना मदतीसाठी संपर्क साधला. ज्याच्या आधारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आले आणि आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली पोलीस स्टेशन पानवाडीमध्ये गुन्हा दाखल केला.

Exit mobile version