धर्मांतर करण्यासाठी पालघरमध्ये आलेले ख्रिश्चन मिशनरी पोलिसांच्या ताब्यात

धर्मांतर करण्यासाठी पालघरमध्ये आलेले ख्रिश्चन मिशनरी पोलिसांच्या ताब्यात

धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिश्चन मिशनरींना पकडून पोलिसांच्या हवाली करण्याची खबळजनक घटना पालघरमध्ये घडली आहे. काही ख्रिश्चन मिशनरी धर्मांतर करण्यासाठी पालघरमध्ये आले होती. यावेळी राष्ट्रीय हिंदू सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी काही लोकांना पकडून त्यांच्यावर धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे.

डहाणू- सावता गावातील रुस्तमजी महाविद्यालयाजवळ काही मिशनरी हिंदू कुटुंबांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करत असल्याची माहिती या संघटनेला मिळाली होती. याची माहिती मिळताच संघटनेचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिश्चन मिशनरीच्या लोकांकडे रोख रक्कम आणि ख्रिश्चन धर्माची धार्मिक पुस्तके तसेच संपूर्ण तयार केलेली यादीच मिळाली. राष्ट्रीय हिंदू सेवा संघ, विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच

थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी

मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही

हे मिशनरी लोक गरीब लोकांना लक्ष्य करतात आणि त्यांच्या शब्दात आमिष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडतात. मात्र आम्ही त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही असे राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे परेश भारवाड यांनी सांगितले.

अद्याप गुन्हा दाखल नाही

जवळपास ४ तास होऊनही पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही असे वकील आशुतोष दुबे यांनी सांगितले. डहाणूचे पोलीस अधिकारी नार्वेकर म्हणाले की, प्रकरण गंभीर आहे. काही उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Exit mobile version