मध्य प्रदेशमधील ४०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. इंदूरमधील एका ख्रिश्चन दाम्पत्यावर असा आरोप करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या रात्री पार्टीच्या नावाखाली या जोडप्याने ४०० आदिवासींना एकत्र करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र, हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलन सुरू केल्यामुळे ते यशस्वी झाले नाहीत. तसेच त्यानंतर या दाम्पत्याने घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी या संबंधित ख्रिश्चन जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपींने सांगितले की, त्यांनी हा कार्यक्रम गरीबांना जेवण मिळावे म्हणून आयोजित केला होता. धर्म परिवर्तन करण्याचा उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले. मनीष आणि मनीषा अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. दोघेही अंबामुली येथे राहतात. सनवडिया गावातील पॅरामेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. आदिवासींना भोजन आणि प्रार्थनेच्या नावाखाली एकत्र करण्यात आले होते.
हे ही वाचा:
कोरोनामुळे २ हजार प्रवाशी क्रूझवर अडकले
जेवण दिले नाही म्हणून हॉटेल मालकाला घातली गोळी
फुटबॉलपटू मेस्सीला कोरोनाने गाठले
देशभरातील मुलांच्या ‘दंड’बैठका आजपासून सुरू
घटनास्थळी पोलिस येण्यापूर्वीच आरोपींनी तेथून पळ काढला होता. मनीष हा एक एनजीओ चालवतो. तसेच तो ख्रिश्चन धर्माचा प्रसारकही आहे. त्याने धर्मांतरासाठी लोकांना एकत्र केले होते, असा आरोप हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.