नाशिकच्या म्हसरूळमधील ज्ञानदीप आश्रमातील विद्यार्थीनींवर हर्षल मोरे या नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून यासंदर्भात भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, संतापजनक घटना आपण पाहिलीत आम्ही शंका बोलून दाखविली की, जो आरोपी आहे हर्षल मोरे त्याने या मुलींवर अत्याचार केल्याची घटना आहे. त्या आश्रमात १३ मुले राहात होत्या. इतर मुलींसोबत नव्हे तर सहा मुलींसोबत त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सहा वेगवेगळे गुन्हेही त्याच्यावर दाखल झाले आहेत, अशी माहिती भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.
या गुरुकुल आश्रमातील सहा विद्यार्थीनींवर आश्रमात नाही तर बाहेरही अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. नराधम हर्षल मोरे हा या मुलींना सटाणा, वीरगाव येथे कामानिमित्त नेऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. २०१८पासून हे शोषण सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्यभरात या नराधमाविरुद्ध संतापाची लाट उसळली असून त्याच्याविरुद्धच्या सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. १३ पैकी ५ मुलींनी अत्याचाराची माहिती दिली आहे.
नाशिक- म्हसरूळ ज्ञानदीप आश्रमाच्या संचालकाने आदिवासी मुलीवर केलेला अत्याचार हा एकाचं मुलीवर नाही तर तब्बल ६ मुलींवर केल्याच पोलिस तपासणीत समोर आलयं@nashikpolice ६ वेगवेगळे गुन्हे
IPC 376,Pocso अनुसुचित जाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल केलेले आहेत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे pic.twitter.com/u8Rivg3yHB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 27, 2022
चित्रा वाघ म्हणाल्या की, ३७६ आहे, पॉक्सो, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अशा कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुटणार नाही हे निश्चित काही दिवसांपूर्वी या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये चार वर्षआंच्या मुलाचा खून झआल्याचेही दिसून आले होते. या गोष्टींमध्ये अनधिकृत आश्रमांचं पेव फुटलेलं आहे. महिला मोर्चा नाशिक युनिट भाजपाने उद्या कलेक्टर चॅरिटी कमिशनर यांची भेट घेऊन या संस्थांची मान्यता रद्द करावी अशी मागणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
आफताबच्या गाडीवर तलवारीने हल्ला; प्रकरण चिघळले
सेंट्रल लायब्ररीच्या निमित्ताने मविआ सरकारने घातला राज्याच्या तिजोरीवरच दरोडा
केवळ नाशिक नाही राज्यातील सर्वांचं ऑडिट व्हावं जनतेला आवाहन आहे. की तुमच्या आजूबाजूला अशा संशयास्पद हालचाली आढळल्या तर पोलिसांकडे तक्रार करा. पोलिस आपले आहेत, सरकार आपले आहेत, असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले आहे.
हा आश्रम द किंग फाऊंडेशनच्या नावे आहे. मोरेची सासू ज्योती शिंदे व एक महिला या मुलींची व्यवस्था पाहते. सदर मोरे हा नराधम यापूर्वी वसतिगृहात मॅनेजर होता. तिथेही त्याची २०१७मध्ये नोकरी गेली. त्यानंतर त्याने स्वतःच आश्रम टाकला. आदिवासींसाठी काम करत असल्याची बतावणी करत त्याने देणग्या वसूल केल्या.