चायनीज ऍप प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत विविध बँक खाती आणि व्हर्च्युअल खाती अशी एकूण ४६.६७ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. चायनीज लोन अॅप प्रकरणात नुकत्याच झालेल्या छापेमारीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने जोरदार कारवाई केली आहे.
केंद्रीय तपास संस्थेने विविध बँक खाती आणि ईझीबझ, रेझरपे, पेटीएम आणि कॅशफ्री या पेमेंट गेटवेचे आभासी खात्यांमध्ये ठेवलेले ४६.६७ कोटी रुपये गोठवले आहेत. ईडीने १५ सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, चायनीज ऍप प्रकरणी केलेल्या कारवाईत विविध बँक खाती आणि आभासी खात्यांमधील एकूण ४६.६७ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.
तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील ईझीबझ प्रायव्हेट लिमिटेडकडे एकूण ३३.३६ कोटी रुपये सापडले आहेत, तर बंगळुरूच्या रेझरपे सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडकडे ८.२१ कोटी रुपये सापडले आहेत. त्याचप्रमाणे १.२८ कोटी रुपये कॅशफ्री पेमेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बंगळुरूजवळ, पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड, नवी दिल्लीजवळ मिळालेले १.११ काेटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला, बेंगळुरूमधील रेझरपे, पेटीएम आणि कॅशफ्रीच्या परिसरावर छापे टाकण्यात आले आणि त्यांच्या खात्यांमध्ये जमा केलेले १७ कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. सर्वात अलिकडील कारवाई १४ सप्टेंबर रोजी करण्यात आली, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, गाझियाबाद, लखनौ आणि गया येथे आरोपींच्या आवारात छापे टाकण्यात आले.
हे ही वाचा:
अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क
७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
काही दिवसांपूर्वी ईडीने चायनीज लोन ऍप प्रकरणात दिल्ली, गाझियाबाद, लखनऊ, मुंबई आणि बिहारमधील गयासह ६ ठिकाणी या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. ईडीने एचपीझेड नावाच्या ऍप-आधारित टोकन आणि संबंधित संस्थांविरुद्धच्या चौकशीच्या संदर्भात दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर, बेंगळुरू येथे असलेल्या बँका आणि पेमेंट प्लॅटफॉर्मच्या १६ परिसरांची देखील झडती घेतली हाेती. नागालँडमधील कोहिमा पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रँचने ऑक्टोबर २०२१ मध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. झडतीदरम्यान गुन्ह्यात हात दर्शविणारी अनेक कागदपत्रे सापडली आहेत, जी जप्त करण्यात आली आहेत