कांदिवली येथे मूल दत्तक घेत असलेल्या एका जोडप्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने या जोडप्याच्या नावाखाली बरेच गुन्हे केले असल्याची शंका देखील व्यक्त केली जातं आहे.
तक्रारदार महिलेच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत. २०२० मध्ये, एका परिचिताने तिची ओळख एका एजंट, साहिल शेखशी करून दिली होती. मुल दत्तक घेण्यासाठी तो इसम मदत करेल अशी माहिती देण्यात आली होती. शेख यांनी मूल दत्तक घेण्याच्या फॉर्मसह जोडप्याच्या घरी भेट दिली. त्याच्या स्वाक्षर्या आणि फोटो काढले तसेच त्यांचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड यांचे तपशील घेतले .
शेख यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितले की, या प्रक्रियेसाठी अडीच लाख रुपये खर्च येईल. मी त्यांना सांगितले की इतके पैसे देणे आम्हाला परवडणार नाही, असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले. तरीही त्या जोडप्याने १ लाख ५० हजार रुपये भरले. थोड्या दिवसांनी त्याने त्या जोडप्याला एका नवी मुंबईतील मुलीचा फोटो दाखवला. पण नंतर शेख यांनी या संबंधी बोलण्बयास टाळाटाळ करू लागला.
हे ही वाचा:
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार ताब्यात
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी सापडल्या सोन्याच्या खाणी
१४ वर्षे गायब असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक करताना ओळखली ही खूण
पुढे यादरम्यान या जोडप्याला एका कंपनीकडून कर्ज घेतल्यासंदर्भात फोन आला. त्या कंपनीने ६ हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड मागितली. या जोडप्याने स्पष्ट केले की त्यांनी कधीही कोणाकडून कर्ज घेतले नाही. तसेच यावर्षी ऑगस्टमध्ये या महिलेला दुसर्या कंपनीकडून पुन्हा फोन आला आणि ८० हजार रुपयांच्या ऑटोमोबाईल कर्जाची परतफेड करण्याची मागणी केली. हे सर्व पाहून तिने शेख याची चौकशी केली. त्या चौकशीनंतर तिला असे वाटले की तो तिच्या नावावर कर्जाचा लाभ घेत आहे, आणि दत्तक प्रक्रियेसाठी त्याने गोळा केलेले तिचा ओळख पुरावे आणि फोटोंचा गैरवापर करीत आहे. तिला कर्जाची परतफेड करण्यासाठी बऱ्याच नोटिस मिळत राहिल्या म्हणून समता नगर पोलिस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली. बुधवारी शेख यांच्याविरूद्ध फसवणूकीचे एफआयआर नोंदविण्यात आला आहे.