केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने एक मोठी कारवाई करत दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकत लहान मुलांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.तपास यंत्रणेने ७ ते ८ मुलांची सुटकाही केली आहे. याप्रकरणी काही आरोपींना ताब्यातही घेण्यात आले आहे.
सीबीआयने शुक्रवारी (एप्रिल) संध्याकाळी रोहिणी आणि केशवपुरममधील अनेक भागात छापे टाकण्यात आले.मुलांच्या विक्री आणि खरेदीमध्ये कथित सहभाग असलेल्या महिला आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह सात जणांना एजन्सीने अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा..
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची ‘छाप’!
१९८४ साली दोन सीट ते २०२४ला ४०० जागा पार करण्याचे लक्ष्य!
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गायब
पंतप्रधान मोदींच्या फोटोंमुळे पालटले लक्षद्वीपचे नशीब!
आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, संपूर्ण भारतातील अपत्यहीन जी जोडपी आहेत, अन ज्यांना मुले दत्तक घेण्याची इच्छा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आरोपी सोशल मीडियाचा वापर करत असे. सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून अशा जोडप्यांशी संवाद साधत लहान बालकांची विक्री केली जात असे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ४ ते ६ लाखपर्यंत नवजात बालकांची विक्री करत असे.सीबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दत्तक घेण्यासंबंधी बनावट कागदपत्रे तयार करून अनेक अपत्यहीन जोडप्यांना फसवण्यात देखील आरोपींचा सहभाग होता.सीबीआयला अर्भकांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर छापे टाकण्यात आले. शोध सुरू असताना तीन नवजात बालकांची सुटका करण्यात आली. छापेमारी करताना ५.५ लाख रुपये रोख आणि इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.