सफाई कर्मचाऱ्याने टोचले इंजेक्शन; लहानग्याचा मृत्यू

सफाई कर्मचाऱ्याने टोचले इंजेक्शन; लहानग्याचा मृत्यू

चुकीच्या इंजेक्शन मुळे एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटनेला काही महिने उलटत नाही तोच एका २ वर्षाच्या मुलाला रुग्णालयातील सफाई कर्मचारीने चुकीचे इंजेक्शन टोचल्यानंतर काही मिनिटांतच त्याचा मृत्यु झाल्याची दुसरी घटना गोवंडीच्या शिवाजी नगर येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोवंडी येथील बैगण वाडी परिसरात राहणारा ताह आजम खान या दोन वर्षांच्या मुलाला उलटी जुलाबाचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला जवळच असलेल्या नूर हॉस्पिटल मध्ये १२ जानेवारी रोजी दाखल केले होते.

दुसऱ्या दिवशी मुलगा बरा होऊन खेळायला लागला होता. त्याच रुग्णालयात एक १६ वर्षाचा रुग्ण उपचारासाठी दाखल होता. डॉक्टरांनी त्या १६ वर्षाच्या रुग्णाला औषधे आणि इंजेक्शन कुठले द्यायचे हे निवासी वैद्यकीय अधिकारी यांना लिहून दिले होते.

निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी नर्सला हे इंजेक्शन १६ वर्षाच्या मुलाला देण्यासाठी सांगितले असता दोन नर्समध्ये इंजेक्शन देण्यावरून क्षुल्लक वाद झाला. त्यात एका नर्सने इंजेक्शन देण्यासाठी १७ वर्षाची रुग्णालयातील सफाई कर्मचारी तरुणीला सांगितले असता. या सफाई कर्मचारीने १६ वर्षाच्या रुग्णा ऐवजी ते इंजेक्शन २ वर्षाच्या मुलाला दिले, एक इंजेक्शन सलाईनमधून दिले तर दुसरे इंजेक्शन थेट टोचले काही मिनिटांतच मुलाचा जागीच मृत्यु झाला.

या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला देण्यात आलेले इंजेक्शनचे बॉक्स घेऊन रुग्णालयात गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांना शांत करून त्यांची तक्रार दाखल करून घेतली.

हे ही वाचा:

आर्थर रोड तुरुंगात कैद्याने केली आत्महत्या

आरोग्यसेविकांना ना पुरेसे वेतन, ना पेन्शन, ना विमा!

‘राणीच्या बागेत दुर्मिळ प्राण्यांच्या नावाने १०६ कोटींचा घोटाळा’

उत्तरप्रदेश निवडणुकीतील ‘M’ फॅक्टर

 

मुलाला टोचलेले इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले असता त्याचा अहवाल गुरुवारी येताच शिवाजी नगर पोलीसांनी रुग्णालयाचे संचालक, निवासी वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि सफाई कर्मचारी तरुणीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली.

Exit mobile version